For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संतोषकडून प्रेमपुंगपोंगचा पराभव

06:31 AM Jul 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
संतोषकडून प्रेमपुंगपोंगचा पराभव
Advertisement

बॅडमिंटन आशिया ज्युनियर चॅम्पियनशिप

Advertisement

वृत्तसंस्था, यात्सुशिरो (जपान)

येथे सुरू झालेल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत, भारताच्या ध्यान संतोषने थायलंडच्या सहाव्या मानांकित पन्नातात प्रेमपुंगपोंगचा पराभव करत भारतीय खेळाडूंच्या दमदार कामगिरीचे नेतृत्व केले.

Advertisement

संतोषने मुलांच्या एकेरीच्या पहिल्या फेरीत उत्कृष्ट खेळ करत प्रेमपुंगपोंगचा 21-17, 21-18 असा पराभव केला. त्यानंतर तन्वी पात्रीने मुलींच्या एकेरीच्या सलामीच्या फेरीत सहज विजय मिळवला. तिने इंडोनेशियाच्या ख्रिस्टाबेल पुरवांतोचा 21-18, 21-6 असा पराभव केला तसेच पाचव्या मानांकित रुपारेलियाने श्रीलंकेच्या पामुडू रंदिलिगामाचा 21-13, 16-21, 21-7 असा पराभव केला. मैदानात उतरलेल्या इतर भारतीयांपैकी, आदर्शनी श्रीने मलेशियाच्या ली के झिनचा 21-22, 21-12 असा पराभव केला. मात्र अभिनव गर्गला मलेशियाच्या लुकास लीकडून 13-21, 22-24 असा पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement
Tags :

.