For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संतोष चिले यांना शिवाजी महाराज सामाजिक व साहित्य पुरस्कार

04:13 PM Jun 10, 2026 IST | अनुजा कुडतरकर
संतोष चिले यांना शिवाजी महाराज सामाजिक व साहित्य पुरस्कार
Advertisement

​के. एस. आय. पब्लिकेशन व विद्यानिकेतन संस्थेचा पुरस्कार

Advertisement

ओटवणे  : प्रतिनिधी
​के. एस. आय. पब्लिकेशन महाराष्ट्र राज्य आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेचा यावर्षीचा मानाचा 'राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व साहित्य पुरस्कार - २०२६' ओटवणे गावाचे सुपुत्र प्रसिद्ध साहित्यिक संतोष चिले यांना प्रदान करण्यात आला. सातारा - वाई येथे लोकमान्य टिळक वाचनालयाच्या रमेस गरवारे सभागृहात झालेल्या मिरग नक्षत्र' राज्यस्तरीय ५ व्या कवी संमेलनात संतोष चिले यांना मान्यवरच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.​'मिरग नक्षत्र' हे साहित्य, संस्कृती आणि संवेदनांचा संगम असलेले व्यासपीठ असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन मराठी भाषेचे वैभव वाढवणाऱ्या साहित्यिकांचा गौरव करणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. साहित्यिक संतोष चिले यांना त्यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आणि सृजनशील लेखणीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.मराठी साहित्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या लेखकांचा गौरव होऊन नवी पिढी साहित्याकडे अधिक उत्साहाने आकर्षित होईल या उद्देशाने मिरग नक्षत्राचे आयोजन करण्यात येते. या संमेलनात कवी संतोष चिले यांनी उत्कृष्ट कविता सादर करून उपस्थितांना खिळवून ठेवले. साहित्यिकांचे दर्जेदार काव्य सादरीकरण आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याने या 'मिरग नक्षत्र' संमेलनाची महती वाढवली. शेवटी 'जय शिवराय, जय भारत' या घोषणेने या संमेलनाची सांगता झाली.

Advertisement

Advertisement
Tags :

.