संतमीरा, भातकांडे, विवेकानंद उपांत्य फेरीत
बेळगाव : संतमीरा शाळा गणेशपुर हिंडलगा आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात संतमीरा अनगोळ, गजाननराव भातकांडे, शांतीनिकेतन स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर यांनी प्रतिस्पर्ध्यां संघाचे मात करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. गणेशपुररोड येथील गुडशेफर्ड शाळेच्या आवारातील बेळगाव टर्फ मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर आनंद चव्हाण विमल स्पोर्टस फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, जनकल्याण ट्रस्टचे सचिव सुधीर गाडगीळ, लक्ष्मण पवार, संत मीरा गणेशपुर शाळेचे अध्यक्ष डॉ विजय गोवेकर सचिव देवीप्रसाद कुलकर्णी, मुख्याध्यापिका आरती पाटील, विद्याभारती जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ नाईक, विनायक ग्रामोउपाध्ये ,विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख सी. आर. पाटील, श्वेता पाटील आशा भुजबळ श्रीकांत कांबळे या मान्यवरांच्या उपस्थितीत सरस्वती व भारतमाताचे फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंची ओळख व फुटबॉल चेंडूला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी किरण जाधव आनंद चव्हाण यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केली. या स्पर्धेचं पंच म्हणून शिवकुमार सुतार, यश पाटील,मानस नायक,आदित्य सानी ,सोहम ताशिलदार, प्रणव देसाई, ओमकार गावडे, हर्ष रेडेकर, आदी उपस्थित होते.