For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांतईनेज रस्ता 28पासून वाहतुकीसाठी खुला

06:01 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
सांतईनेज रस्ता 28पासून वाहतुकीसाठी खुला
Advertisement

इमेजीन पणजी स्मार्ट सिटी कंपनीकडून माहिती

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात येत असलेला सांतईनेज भागातील रस्ता सध्या पूर्णत्वास आला असून त्याच्या नियोजित वेळेत म्हणजेच येत्या मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 9 वाजता तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटी कंपनीने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.

Advertisement

नव्याने बांधण्यात आलेला सदर रस्ता सुमारे 1.5 कि. मी लांबीचा असून त्यात विवांता हॉटेलपासून शितल हॉटेलमार्गे मधुबन जोडरस्ता पर्यंतचा भाग आणि  दुसऱ्या बाजूने शितल हॉटेल ते काकुलो मॉल जोडरस्ता पर्यंतच्या भागांचा समावेश आहे.

हा रस्ता खुला करण्यात आल्यानंतर काकुलो मॉल भागातील रस्त्याची अत्यंत गुंतागुंतीची शिल्लक कामे हाती घेण्यात येणार आहेत. मात्र त्यासाठी पुढील काही दिवस हा रस्ता बंद ठेवण्यात येणार असून काँक्रिट क्युरिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दि. 7 जूनपासून तो खुला करण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटी कंपनी आपल्या दर्जेदार कामांसह ती नियोजित वेळेत पूर्ण करण्यास कटिबद्ध असून त्याद्वारे राजधानीतील साधनसुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी योगदान देणे हा उदात्त हेतू आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत विकसित केलेले सांतइनेजमधील नवीन सुधारित रस्ते वाहतुकीसाठी खुले करताना आम्हाला आनंद होत आहे, असे कंपनीचे सीईओ संजीत रॉड्रिगीश यांनी पत्रकात म्हटले आहे.

तसेच विविध पायाभूत सुविधांच्या सुधारणांसह रस्ते ऊंदीकरण हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या सुविधा यशस्वीरित्या विकसित करण्यासाठी स्थानिक लोकांनी दाखविलेला संयम आणि दिलेल्या पाठिंब्यासाठी रॉड्रिगीश यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

Advertisement
Tags :

.