संतिबस्तवाड सेंट जोसेफ स्कूलचे हँडबॉलमध्ये यश
वार्ताहर/किणये
सार्वजनिक शिक्षण खाते यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत संतिबस्तवाड येथील सेंट जोसेफ हायस्कूलच्या मुलांच्या हँडबॉल संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. या स्पर्धा नुकत्याच संत मीरा हायस्कूल अनगोळ येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. एकूण पाच मुलांच्या संघांनी सहभाग घेतला होता. 17 वर्षाखालील स्पर्धेत संतिबस्तवाड संघाने यश मिळवले आहे. या खेळाडूंची विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंचा जिल्हा क्रीडा शिक्षण अधिकारी जुनेद पाटेल व भीमसेनेचे राज्यादक्ष भरत बेळारी आदींच्या वतीने बक्षीस देऊन गौरव करण्यात आला आहे. याचबरोबर याच हायस्कूलमधील सतरा वर्षाखालील दोन मुलींची हँडबॉल संघासाठीही निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंना मुख्याध्यापिका सिस्टर विना, सुप्रिया बी. एस., क्रीडा शिक्षक सायमन सनक्की व सहशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.