आचरा ग्रामपंचायत उपसरपंचपदी संतोष मिराशी बिनविरोध
नवनिर्वाचित सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनीही स्वीकारला पदभार
आचरा प्रतिनिधी
आचरा ग्रामपंचायत निवडणूकीनंतर झालेल्या ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत प्यानेल कडून सदस्य संतोष मिराशी यांच्याकडून एकमेव अर्ज दाखल झाल्याने उपसरपंचपदी संतोष मिराशी यांची बिनविरोध निवड झाली आहे 5 नोव्हेंबर ला झालेल्या निवडणुकीत भाजप शिंदेसेना पुरस्कृत पॅनलने ठाकरे सेनेच्या प्यानलला पराभवाची धूळ चारत एकहाती सत्ता मिळवली होती. उपसरपंच निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष केला. उपसरपंच पदासाठीच्या झालेल्या निवडणूकिसाठी निवडणूक अधिकारी म्हणून महसूल आचरा मंडल अधिकारी अजय परब, ग्रामविस्तार अधिकारी पी. जी कदम, ग्रामपंचायत प्रशासक विनायक जाधव यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी सरपंचपदाचा पदभार स्वीकारला.
आचरा येथील ग्रामपंचायतीवर भाजप शिंदसेना पुरस्कृत आघाडीच्या प्यानेलने सरपंच पदासहं 13 पैकी 11 उमेदवारांनी विजय मिळवून ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करण्यासाठी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते आज उपसरपंच निवडीसाठी भाजप शिंदेसेना पुरस्कृत उमेदवारांनी निवडीसाठी एकमेव अर्ज भरल्याने उपसरपंच बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले होते.
भाजप कार्यकत्यांनी केला जल्लोष
आचरा ग्रामपंचायत उपसरपंच निवडणूकीच्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधीपासूनच ग्रामपंचायत कार्यालाकडे गर्दी केली होती उपसरपंच भाजपचे बिनविरोध होताच कार्यक्रत्यांनी जल्लोष केला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच जेरॉन फर्नांडिस, माजी सभापती नीलिमा सावंत, राजन गावकर, डॉ प्रमोद कोळंबकर, पांडुरंग वायंगणकर, लवू मालंडकर, राजन गावकर, तलाठी संतोष जाधव, जेम्स फर्नांडिस, अभय भोसले, जप्रकाश परुळेकर, उदय घाडी, गुरु कांबळी, मंदार सरजोशी, श्रीपाद सावंत, किशोर आचरेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, महेंद्र घाडी, सारिका तांडेल, योगेश गावकर, सायली सारंग, चंद्रकांत कदम, हर्षदा पुजारे, पंकज आचरेकर, किशोरी आचरेकर, श्रुती सावंत, अनुष्का गावकर, पूर्वा तारी आदी उपस्थित होते.