Pune News : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत
03:51 PM Jul 01, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज शहरात आगमन झाले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पालखीचे स्वागत करून पूजन करताच परिसर ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराने दुमदुमला.
Advertisement
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, तहसीलदार पंकज पवार, अमोल निकम, प्रदीप वर्पे, नगर प्रशासनाचे सहायक आयुक्त श्याम गोसावी, संत श्री. निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख मनोजकुमार राठी, विश्वस्त ॲड. एस.डी.घोटेकर यांच्यासह विविध विभागांचे वरीष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisement
Advertisement