संत मीराला फुटबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट
विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा स्कुलच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींच्या फुटबॉल संघाने कुऊक्षेत्र हरियाणा येथे झालेल्या विद्याभारती अखिल भारतीय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत दुहेरी मुकुट संपादन केला. या संघाची रांची झारखंड येथे होणाऱ्या एसजीएफआय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.कुऊक्षेत्र हरियाणा येथे 16 ते 21 सप्टेंबर दरम्यान झालेल्या 36 व्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा संघाने दक्षिणमध्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले होते. 14 वर्षाखालील मुलींच्या गटातील पहिल्या सामन्यात कर्नाटकच्या संत मीराने पंजाबचा 2-0 असा पराभव केला. संतमीराच्या समीक्षा खन्नूरकरने 2 गोल केले. दुसऱ्या सामन्यात संत मीराने उत्तर प्रदेशचा 1-0 असा पराभव केला, संत मीराच्या प्रणिती बडमंजीने 1 गोल केला. तिसऱ्या सामन्यात संत मीरा कर्नाटकने राजस्थानचा 8-0 असा पराभव केला, संत मीरातर्फे निधीशा दळवीने 3 गोल, समीक्षा खन्नूकर, कल्याणी हलगेकर प्रत्येकी 2 गोल, तर हर्षिता गवळीने 1 गोल केला.
चौथ्या सामन्यात संत मीरा कर्नाटकने मध्य प्रदेशचा 5-0 असा पराभव करीत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. संत मीरातर्फे निधीशा दळवीने हॅट्रिकसह 3 गोल, समीक्षा खन्नूकरने 2 गोल केले. माध्यमिक मुलींच्या गटातील पहिल्या लढतीत संत मीराने राजस्थानचा 5-0 असा पराभव केला. संत मीरातर्फे दीपिका व दीपा बिडीने प्रत्येकी 2 गोल तर मोनिताने 1 गोल केला. दुसऱ्या सामन्यात संत मीराने उत्तर प्रदेशचा 3-0 असा पराभव केला. संत मीरातर्फै दीपिकाने 2, दीपा बिडीने 1 गोल केला. तिसऱ्या सामन्यात संत मीराने बिहारचा 2-0 असा पराभव केला. संत मीरातर्फे दीपिका व दीपा बिडीने प्रत्येकी 1 गोल केला. अंतिम सामन्यात संत मीराने पंजाबचा 4-0 असा पराभव केला. संत मीरातर्फे कर्णधार दिपा बिडीने 2 गोल तर दीपिका व मोनिताने प्रत्येकी 1 गोल केला.
विजेत्या प्राथमिक मुलींच्या संघात कर्णधार निधिशा दळवी, उपकर्णधार समीक्षा खन्नूकर, अद्विता दळवी, आदिती सुरतेकर, कनिष्का हिरेमठ, कृतिका हिरेमठ, हषिता गवळी, अनन्या रायबागकर, कल्याणी हलगेकर, समुध्दी कोकाटे, समुध्दी घोरपडे, प्रणिता बडमंजी, स्वाती फडनाडी तर माध्यमिक मुलींच्या संघात कर्णधार दीपा बिडी, उपकर्णधार हर्षदा जाधव, सृष्टी सातेरी, श्रेया लाटुकर, मोनिता रियांग, दीपिका रिंयांग, अमृता मालशोय, श्र्रद्धा भंडारगाळी, संचिता सुतार, सिंचना तिगडी, श्रुती येळ्ळूरकर, हिंदवी शिंदे यांचा समावेश होता. या संघाला क्रीडाशिक्षक, शिवकुमार सुतार, यश पाटील शिक्षिका धनश्री पाटील आदीचे मार्गदर्शन तर परमेश्वर हेगडे, माधव पुणेकर, सुजाता दप्तरदार, ऋतुजा जाधव, सी. आर. पाटील यांचे प्रोत्साहन लाभत आहे.