कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विभागीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, सेंटपॉल्स विजेते

11:08 AM Oct 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Advertisement

बेळगाव : टिळकवाडी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या विभागीय स्तरीय प्राथमिक मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगांवचे प्रतिनिधित्व करताना मुलींच्या गटात संत मीराने तर मुलांच्या गटात सेंटपॉल स्कूलने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. टिळकवाडी येथील सुभाषचंद्रबोस लेले मैदानावर मुलींच्या गटातील उपांत्य सामन्यात चिक्कोडीने धारवाडचा पराभव केला. तर अंतिम सामन्यात संत मीरा बेळगावने चिक्कोडीचा 2-1 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. संतमीरा संघाच्या समीक्षा खन्नुरकर, धुर्ती शेट्टी यांनी प्रत्येकी 1 गोल केले. तर मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात सेंट पॉल स्कूलने चिक्कोडीचा अटीतटीच्या लढतीत 3-1 असा पराभव करीत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले  सेंटपॉल्स संघाच्या आराध्या नाकाडीने 2 गोल, रायन पत्कीने 1 गोल केला.

Advertisement

स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल,  प्रणय शेट्टी, पुनित शेट्टी, प्रसन्ना शेट्टी,  राकेश कांबळे, सचिव पवन कांबळे,  शमा देगसकर, पुनम अष्टेकर, अनुराधा देगसकर, प्रभा चिखलकर, स्नेहा दळवी, गीता देसाई, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव प्रवीण पाटील, नागराज भगवंतण्णावर,  रमेश सिंगद  चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,  याप्रसंगी पंच मानस नायक, उमेश मजुकर, हर्ष रेडेकर, अमन सय्यद, ताहिर बेपारी, रामलिंग परीट, संतोष दळवी उमेश बेळगुंदकर, अनिल जनगौडा, अनिल गोरे, अर्जुन भेकणे, अश्विनी पाटील, सखुबाई हावळकोड, सुभाष भंभीर, आय एम पटेल, उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article