राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी संत मीराचे खेळाडू रवाना
बेळगाव : मध्यप्रदेश सतना येथे होणाऱ्या 35 व्या अखिल भारतीय विद्याभारती राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी संत मीरा शाळेच्या ॲथलेटिक्स खेळाडू रवाना झाले आहेत. मध्येप्रदेश सतना येथील सरस्वती विद्यालय शाळेच्या मैदानावर होणाऱ्या 35 व्या राष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेसाठी शाळेचे खेळाडू समीक्षा बुद्रुक, नताशा चंदगडकर, भावना बेर्डे ,हे खेळाडू शाळेच्या क्रीडा शिक्षिका मयुरी पिंगट यांच्यासह रवाना झाले आहेत. सरस्वती विद्यापीठ विजयवाडा आंध्रप्रदेश येथे झालेल्या विद्याभारती क्षेत्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत समीक्षा बुद्रुकने 3000,100 व 400 मी. रिले प्रकारात 3 सुवर्णपदक पटकाविले आहे, नताशा चंदगडकर हिने लांबउडी, तिहेरीउडी व 100 मी. रिले प्रकारात 3 सुवर्णपदक पटकाविले तर प्राथमिक मुलींच्या गटात भावना बेर्डे हिने 100 मी. धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक, 100 मी. रिले प्रथम क्रमांक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या खेळाडूंना शाळेच्या क्रीडा शिक्षिका मयुरी पिंगट, शिवकुमार सुतार, यश पाटील, अनुराधा पुरी, सी. आर. पाटील, यांचे मार्गदर्शन तर शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, ऋतुजा जाधव, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे यांचे प्रोत्साहन लाभत आहे.