For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur : पाटकुलच्या बाजारात संक्रातीचा उत्साह, खण- वाण खरेदीसाठी महिलांची लगबग!

06:14 PM Jan 08, 2026 IST | NEETA POTDAR
solapur   पाटकुलच्या बाजारात संक्रातीचा उत्साह  खण  वाण खरेदीसाठी महिलांची लगबग
Advertisement

                           मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पाटकुलची बाजारपेठ गजबजली

Advertisement

by सुहास परदेशी

पाटकुल : मकर संक्रातीचा सण आता काही दिवसांवर येऊन ठेपलाय. महिला वर्गामध्ये मकर संक्रातीचं विशेष महत्त्व असतं. या निमित्तानं काही महिला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. त्याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी पाच, सात, अकरा, एकवीस याप्रमाणे महिलांना बोलावून वाण देण्याचा कार्यक्रम ठेवतात . वाण म्हणजे संक्रांतीनिमित्त भेटवस्तू देणे. अनेक घरातील महिला संक्रांतीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या महिलांना भेटवस्तू देत असतात. संक्रातीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी सध्या पाटकुल ची बाजारपेठ सजली आहे. या वस्तू खरेदी करण्यासाठी सध्या बाजारपेठेमध्ये महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत‌

Advertisement

बाजारात विशेष म्हणजे नववधू आणि मुलांसाठी हलव्याच्या दागिन्यांचे वैविध्यपूर्ण प्रकार यंदा पाहायला मिळत आहेत. पारंपारिक हार, कानातले, बाजूबंद, गळ्यातल्यासोबत बांगड्या, पाटल्या, तोडे यामध्ये वेगळेपण दिसून येते. लहान मुलांच्या दागिन्यामध्ये बासरी, मुकुट यासह हातातली वाळी, कडे, गळ्यातले हारही उपलब्ध होते.

संक्रातीला विशेष मान असणारे हलव्याचे दागिने, तीळगुळ, वाण म्हणून वाटण्यासाठी गृहोपयोगी वस्तू यांच्या खरेदीला महिलांचे प्राधान्य होते. बाजारात तिळाची रेवडी, गुलाबी रेवडी, लाडू, तीळ वडी, चिक्की, पांढरे साखरेचे तीळगुळ यांना जास्त मागणी होती. संक्रांतीला जसे तीळगुळाचे महत्त्व आहे,

तसेच खनाचा वसादेखील महत्त्वाचा आहे. संक्रांतीला महिला खणाचा वसा घेऊन मंदिरात जातात. तीळगुळ, गाजर, हरभरा, बोर, ऊस, धान्याचे कणीस, एखादे फळ यांचा महिला खण तयार करतात. खणांचा वसा तयार करण्यासाठी आवश्यक असणारे साहित्यदेखील बुधवारी महिलांनी खरेदी केले. खणांच्या ५ नगांना ९० ते १०० रुपये, तर आकाराने लहान असलेल्या बोळक्याच्या ५ नगांना ५० ते ६० रुपये दर होता.

Advertisement
Tags :

.