महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

संकेत सुरुतेकर समर्थ श्री किताबाचा मानकरी

09:41 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : समर्थ व्यायाम मंदिर येथे आयोजित समर्थ श्री टॉप टेन मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धेत  समर्थ व्यायाम शाळेच्या संकेत सुरुतेकर याने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर समर्थ श्री हा मानाचा किताब पटकाविला.सामर्थ्य व्यायाम मंदिर टिळकवाडी येथील सभागृहात ही शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे नारायण पै, डॉ. एस. बी. शेख, अॅड. किणयेकर, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष एम. गंगाधर, समर्थ व्यायाम मंदिरचे माजी शरीरसौष्ठवपटू भारत श्री भारत श्रेष्ठ किताबाचे मानकरी राम पाटील, किरण पोटे, कर्नाटक उदय मानकरी किरण कावळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नारायण पै व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आनंद गोगटे यांच्या हस्ते मारूती मूर्ती पूजन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह उपस्थित व्यायाम शाळेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देऊन करण्यात आले. किरण कावळे यांनी व्यायामशाळेच्या शरीरसौष्ठवपटूंच्या कामगिरीचा आढावा घेऊन व्यायामशाळेतून पुन्हा एकदा मि. इंडिया, हर्क्युलस, कर्नाटक उदय, बेळगाव श्री असे किताब मिळवून देण्यासाठी शरीरसौष्ठवपटूंनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. डॉ. एस. बी. शेख यांनी व्यायामशाळेच्या इतिहासाबद्दल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात नारायण पै यांनी या स्पर्धेतून नवनवीन युवा शरीरसौष्ठवपटू तयार व्हावेत, यासाठी सर्वतोपरी मदत करू व समर्थ व्यायाम मंदिर यांच्यावतीने पूर्ण सहकार्य देऊ, असे सांगून शुभेच्छा दिल्या.

Advertisement

यावेळी सर्व प्रमुख पाहुणे तसेच व्यायाम शाळेचे माजी व्यायामपटू राजू आजगावकर, राजु मरवे, शिवाजी माने, कृष्णा माने, सुनील बोकडे, प्रविण खर्डे, शिवाजी नेसरकर, श्रीकांत देशपांडे, विनायक गुंजटकर, सतीश रेळेकर, अमित हलगेकर, अभी देसूरकर, परशराम मेस्त्राr, प्रभाकर कुर्ट्रे, सुनील राऊत, अजित चौगुले, सुनील पवार यांना व्यायाम शाळेचे प्रशिक्षक राजकुमार बोकडे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत जवळपास 25 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला. यात समर्थ व्यायामशाळेचा संकेत सुरूतेकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर समर्थ श्री हा मानाचा किताब फटकाविला. द्वितीय क्रमांक सौरभ खांडेकर, तृतीय क्रमांक गोपाल सेनवी, चौथा सर्वज्ञ चतुर, पाचवा रवी बेटगिरी, सहावा ओमकार बोकडे, सातवा क्रमांक मंगेश शिंदोळकर, आठवा क्रमांक भावेश ताशिलदार, नववा क्रमांक अनूज चौगुले तर दहावा क्रमांक अजय चौगुले यांनी फटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देण्यात आली. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी समर्थ श्री किताब विजेत्याला रोख रक्कम देऊन गौरविले. स्पर्धेसाठी पंच म्हणून बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष व राष्ट्रीय पंच एम. गंगाधर व सुनील पवार यांनी काम पाहिले. तर स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत यांनी काम पाहिले. यावेळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समर्थ व्यायाम मंदिरच्या सर्व व्यायामपटूंनी परिश्रम घेतले

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article