For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कसई -दोडामार्ग नगरपंचायत मुख्याधिकारीपदी संकेत गायकवाड यांची नियुक्ती

04:34 PM Aug 24, 2024 IST | अनुजा कुडतरकर
कसई  दोडामार्ग नगरपंचायत मुख्याधिकारीपदी संकेत गायकवाड यांची नियुक्ती
Advertisement

संतोष नानचे आणि नगरसेवकांनी केले स्वागत

Advertisement

दोडामार्ग - वार्ताहर

कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या मुख्याधिकारी पदी संकेत गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे व अन्य नगरसेवकांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले. श्री. गायकवाड हे बारामती येथील आहेत. त्यांनी या आधी गटविकास अधिकारी म्हणून नागपुर येथे काम पाहिले होते. तर सध्या दापोली ( जि. रत्नागिरी ) येथेही ते परिविक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून काम पाहत होते. तेथून त्यांची आता येथील नगरपंचायतवर कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे, नगरसेवक रामचंद्र ठाकूर, सोनल म्हावळंकर, पांडुरंग बोर्डेकर, व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष सागर शिरसाट, सुनील म्हावळंकर आदिनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.