For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आदि अनंत’मध्ये संकर्षण कऱ्हाडे

06:24 AM Oct 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
आदि अनंत’मध्ये संकर्षण कऱ्हाडे
Advertisement

अशोक सराफ यांच्यासोबत दिसणार

Advertisement

काही नाती आपल्याला नशिबानं मिळतात, तर काही आपण कमावतो... नात्यांमधल्या प्रेमाची, सहवासाची आणि भावनांची गोष्ट हसत खेळत, धमाल करत सांगणाऱ्या ‘आदि अनंत’ या आगामी मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं दिसून येतं. एका व्यक्तीच्या कुशीत दुसऱ्याने विसावलेले हे दृश्य परस्परांवरील विश्वास, आपलेपणा आणि भावनिक आधाराची जाणीव करून देतं. त्यामुळे आदि अनंत नेमक्या कोणत्या नात्याची गोष्ट सांगणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटात अशोक सराफ, संकर्षण यांच्यासह सखी गोखले, वैदेही परशुरामी, योगेश शिरसाट, कविता लाड, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले, गुरू ठाकुर असे दमदार कलाकार पहायला मिळणार आहेत. आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणसं जवळ असूनही त्यांच्यातलं भावनिक अंतर वाढतंय. अशा वेळी आपल्या माणसांचा सहवास, त्यांचं प्रेम आणि सहवास किती महत्त्वाचा आहे, याभोवती आदि अनंतची कथा गुंफली आहे. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळ्या रुपात दिसणाऱ्या नात्यांची ऊब आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आठवणी या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असल्याचे समजते.

Advertisement

नात्यांमध्ये अनेकदा न बोलताही खूप काही सांगितलं जातं. एखाद्या नात्याची किंमत त्यातल्या मोठ्या प्रसंगांपेक्षा छोट्या छोट्या क्षणांत जाणवते. आदि अनंत करताना मला याच भावविश्वाला पडद्यावर मोकळेपणाने जगवायचं होतं. प्रत्येक पात्राच्या भावनांशी प्रेक्षकांनी कुठेतरी स्वत:ला जोडावं, हा या चित्रपटामागचा प्रयत्न असल्याचे दिग्दर्शक महेश लिमये यांनी म्हटले आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Advertisement
Tags :

.