तिलारीच्या अधिकाऱ्यांना संजू परब यांचा ग्रामस्थांसह घेराव
सावंतवाडी : प्रतिनिधी
येथील नेतर्डे कालव्याचं काम गेल्या सहा वर्षापासून अपूर्ण असल्याने आज संजू परब यांनी ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिलारी विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी संजू परब व प्रमोद कामत यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना येत्या तारखेपर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे. परंतु काम पूर्ण न झाल्यास तोंडाला काळे फासू असा इशारा देखील संजू परब यांनी यावेळी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेतर्डे कालव्याचं काम गेल्या सहा वर्षापासून रखडलं आहे. याबाबत ग्रामस्थांनी आज संजू परब यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर संजू परब यांनी प्रमोद कामत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिलारी कार्यालयात धडक देत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. दरम्यान या कामाचं निलेश राणे यांच्या हस्ते तीन तारखेला शुभारंभ होणार होते. परंतु या कामाबाबत संजू परब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला असता त्या अधिकाऱ्यांकडे कोणतेच उत्तर नसल्याने संजू परब यांनी आक्रमक भूमिका घेत दिलेल्या तारखेपर्यंत काम पूर्ण न झाल्यास तोंडाला काळे फासू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी संजू परब, प्रमोद कामत, वैभवी गवस, गोपीका कोरगावकर, परशुराम गवस, प्रशांत कामत आदी उपस्थित होते