संजीवीनी फौंडेशनतर्फे साधक महिलांचा सत्कार
बेळगाव : येथील संजीवीनी फौंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून 3 साधक महिलांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये डॉ. सुरेखा पोटे, लता बायण्णाचे, रेणू लोखंडे यांचा समावेश होता. संजीवीनी फैंडेशनच्या सल्लागार विद्या सरनोबत, प्रिती चौगुले व संचालिका रेखा बामणे यांच्या हस्ते साधक महिलांना शाल, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यानंतर सत्कारमूर्तींनी आपला जीवनप्रवास विषद केला. अध्यक्षीय भाषणात संजीवीनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी सत्कारमूर्तींच्या प्रेरणादायी वाटचालीची प्रशंसा करीत त्यांचा जीवनप्रवास समाजासाठी आदर्श असल्याचे सांगितले. अनिशा सुळेभावी यांच्या प्रार्थनागीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन समुपदेशक सावित्री माळी यांनी केले. कार्यक्रमाला संजीवीनी निवारा केंद्रातील सदस्या व कर्मचारी उपस्थित होते.