For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजीदा खानला मिळाली मोठी संधी

06:15 AM Dec 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
संजीदा खानला मिळाली मोठी संधी
Advertisement

सनी देओल-अक्षय खन्नासोबत करणार काम

Advertisement

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये सामील सनी देओल आणि अक्षय खन्ना पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. ही जोडी एका हाय-व्होल्टेज अॅक्शन थ्रिलर चित्रपटात काम करणार असून यात अभिनेत्री संजीदा शेखही दमदार भूमिका साकारताना दिसून येणार आहे.

संजीदा शेखचा हा चित्रपट ओटीटी प्रोजेक्ट असून तो पूर्णपणे डिजिटल प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून तयार केला जातोय. या चित्रिकरण मुंबईत पार पडणार आहे. याच्या कहाणीत संजीदा शेख महत्त्वाचा हिस्सा असणार आहे. तिची भूमिका चित्रपटात भावनिक खोली जोडणारी असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisement

हा चित्रपट कुठल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार हे अद्याप स्पष्ट नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ पी. मल्होत्रा करत असून तो स्वत:ची दमदार कहाणी आणि स्टायलिश ट्रीटमेंटसाठी ओळखला जातो. अक्षय खन्ना  धुरंधर चित्रपटातील स्वत:चा लुक आणि अभिनयामुळे सध्या गाजत आहे. तर सनी देओल यांचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपटही चर्चेत असून यात वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ दिसून येणार आहे. संजीदाने अलिकडेच ‘हीरामंडी’ आणि ‘फायटर’मधील स्वत:च्या दमदार अभिनयाद्वारे प्रेक्षक अन् समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Advertisement
Tags :

.