महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संजय सिंह यांच्या कोठडीत 10 जानेवारीपर्यंत वाढ

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुऊवारी आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 जानेवारीपर्यंत वाढ केली. आप नेते संजय सिंह यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी अनेक तासांच्या छाप्या आणि चौकशीनंतर 4 ऑक्टोबर रोजी ईडीने अटक केली होती. मद्य धोरणात अनेक डीलर्सना फायदा मिळवून देण्यासाठी संजय सिंह यांनी कथितपणे पैसे घेतल्याचा ईडीचा दावा आहे. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आप नेते मनीष सिसोदिया हे मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुऊंगात आहेत. याशिवाय ईडीने मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनाही याप्रकरणी चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. हे संपूर्ण प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे आम आदमी पक्ष सांगत आहे. भाजप सूडाच्या भावनेने काम करत असल्याचा दावा आपने केला असला तरी ‘ज्याने चूक केली तो तुऊंगात जाईल,’ असे प्रत्युत्तर भाजप नेते देत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article