संजय सिंह कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष; ब्रिजभुषण यांच्या पॅनेलची सरशी
ब्रिजभूषण सिंग यांच्या जवळचे समजले जाणारे संजय सिंह यांची यांची भारतीय कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यूपी कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष असलेल्या संजय सिंह यांनी त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अनिता शेओरन यांना मिळालेल्या 40 विरुद्ध 7 अशा फरकांनी चीत केले. या निवडणुकीमध्ये विरोधी पॅनेलकडे आवश्यक संख्याबळ नसल्यामुळे हा निकाल एकतर्फीच होणार याची असा अंदाज अगोदरच व्यक्त केला जात होता.
मूळचे वाराणसीचे असलेले संजय सिंह हे भारतीय कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिज भूषण सिंह यांचे विश्वासू मानले जातात. महिला कुस्ती पटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपामुळे गेल्या वर्षभरात चर्चेत असलेल्या ब्रिजभुषण सिंह यांनी या निवडणुकीतून माघार घेऊन आपल्या विश्वासू या निवडणूकीसाठी उतरला होता.
आपल्या विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना सिंह यांनी “ज्यांना कुस्ती करायची आहे त्यांनी कुस्ती करावी आणि ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी राजकारण करावे.” असा टोला महिला आंदोलकांना करताना, "हा विजय गेल्या सात-आठ महिन्यांत त्रास सहन केलेल्या देशातील हजारो कुस्तीपटूंसाठी आहे."अशा भावना व्यक्त केल्या.
अनिता शेओरान यांच्या पॅनेलमधून प्रेम चंद लोचब यांनी ब्रिजभुषण सिंग गटाच्या दर्शन लाल यांना 27- 19 ने पराभूत सचिव पदावर तर आंदोलक कुस्तीपटूंच्या जवळचे मानले जाणारे देवेंद्र सिंग कडियान यांनी आय.डी. नानावटी यांना 32- 15 ने हरवून सरचिटणीसपदावर दावा केला.
ब्रिजभूषण यांच्या पॅनेलने उपाध्यक्षपदाच्या चारही जागांवर विजय मिळवला. त्यामध्ये दिल्लीचे जय प्रकाश (37), पश्चिम बंगालचे असित कुमार साहा (42), पंजाबचे कर्तार सिंग (44) आणि मणिपूरचे एन. फोनी (38) विजयी झाले. मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव हे सुद्धा उपाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते. त्यांनी केवळ पाच मते मिळालीत.
यापुर्वी क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय कुस्तीगीर फेडरेशनच्या निवडणुकीच्या रिंगणात ब्रिज भूषण सिंह यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा जवळच्या व्यक्तींना स्थान दिले जाणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर महिला कुस्तीपटूंनी आपला निषेध मागे घेतला होता.