For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश; प्रत्यक्ष हजेरी बंधनकारक, निखिल वागळेंना ऑनलाइन सुनावणीची मुभा

03:48 PM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश  प्रत्यक्ष हजेरी बंधनकारक  निखिल वागळेंना ऑनलाइन सुनावणीची मुभा
Advertisement
नवी दिल्ली : न्यायालय अवमान प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने खासदार संजय राऊत आणि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. संजय राऊत यांना पुढील सुनावणीवेळी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर निखिल वागळे यांना आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे.

सोशल मीडियावरील कथित वादग्रस्त पोस्टप्रकरणी दाखल झालेल्या न्यायालय अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणात निखिल वागळे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी बाजू मांडली. संजय राऊत यांच्यासंदर्भातील मुद्द्यांवरही न्यायालयात युक्तिवाद झाला.

Advertisement

वागळेंनी माफी मागितल्याचा युक्तिवाद

निखिल वागळे यांच्या वतीने इंदिरा जयसिंग यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. नोटीस मिळाल्यानंतर वागळे यांनी संबंधित सोशल मीडिया पोस्ट हटवली असून, त्यांनी न्यायालयाची बिनशर्त आणि प्रामाणिक माफी मागितली असल्याचे त्यांनी सांगितले.

वागळे यांनी सुमारे पाच दशके स्वतंत्र पत्रकार म्हणून काम केले असून, त्यांचा न्यायालयाचा अवमान करण्याचा हेतू नव्हता, असा युक्तिवादही जयसिंग यांनी केला.

Advertisement

17 नोव्हेंबरला पुढील सुनावणी

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संजय राऊत यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, निखिल वागळे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीला उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. आता 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.