For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्धव ठाकरेंना डावलून संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायंच होतं; शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांचा गौप्यस्फोट

03:53 PM Apr 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
उद्धव ठाकरेंना डावलून संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायंच होतं  शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांचा गौप्यस्फोट
Raju Waghmare
Advertisement

हयात हॉटेलमध्ये दोन बैठकाही घेतल्याची दिली माहिती

कोल्हापूर प्रतिनिधी

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डावलून संजय राऊत यांना मुख्यमंत्री बनायच होतं, असा गौप्यस्फोट शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Advertisement

वाघमारे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना बाजूला करुन राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी हालचाली केल्या होत्या. उद्धव ठाकरे यांना बाजूला करुन आपण सत्तास्थापन करुया यासंदर्भात हॉटेल हयात येथे अजित पवार, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत दोन वेळा बैठकाही घेतल्या असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे ऐकत नाहीत, आमदारांना भेटत नाहीत, कामे करत नाहीत मग त्यांना बाजूला करुन आपण सरकार स्थापन करुया, यासाठी राऊत यांनी पुढाकार घेतला. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कटकारस्थान करणारे राऊत आता त्यांनाच आमचा नेता असल्याचे सांगत आहेत. यावरुन त्यांची दुटप्पी भुमिका दिसून येत असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.