महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करावे; संजय पवार

06:23 PM Jul 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sanjay Pawar ShivSainik
Advertisement

उचगाव/ वार्ताहर

दोन वर्षांपूर्वी कटकारस्थान करून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गद्दांरानी हिरावून घेतले होते, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उद्धव साहेब ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी जीवाचे रान करावे असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते,जिल्हाप्रमुख संजय पवार (उद्धव ठाकरे गट) यांनी केले.

Advertisement

उचगाव ता. करवीर येथे शंभर ज्येष्ठ व गरजूंना छत्रीवाटप समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव होते.
यावेळी बोलताना राजू यादव म्हणाले की, दरवर्षी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढिवसानिमित्त समाजातील गरजू व ज्येष्ठ नागरीकांना करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने पावसाळी छत्र्यांचे वाटप केले जाते. विविध सामाजिक समस्यांवर आंदोलने तसेच अनेक सामाजिक उपक्रमही राबविले जातात. हिंदू जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे यांनी सुखी जीवनाचे कानमंत्र देत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सहसंपर्कप्रमुख विजय देवणे बोलताना म्हणाले दरवर्षी अशा प्रकारे छत्री वाटप करणे खरेच कौतुकास्पद आहे.

Advertisement

कार्यक्रमास उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उचगावप्रमुख दिपक रेडेकर, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले, शरद माळी, विराग करी, अरविंद शिंदे, सुनील चौगुले, योगेश लोहार, शिवानंद स्वामी, दिनेश संकपाळ,शिवाजी लोहार, अजित पाटील,अजित चव्हाण,शरद चव्हाण,संदीप शेटके, केरबा माने आदी शिवसैनिक, पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Advertisement
Tags :
#sanjay pawarCMShivsainikuddhav thackeray
Next Article