For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हसन मुश्रीफ यांच्याकडून देवदेवतांचा अपमान अहंकारातून! संजय पवार यांची पालकमंत्र्यांवर टिका

07:55 PM Apr 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
हसन मुश्रीफ यांच्याकडून देवदेवतांचा अपमान अहंकारातून  संजय पवार यांची पालकमंत्र्यांवर टिका
Sanjay Pawar Hasan Mushrif
Advertisement

साक्षात देवदेवता जरी आल्या तरी संजय मंडलिकांचा पराभव होऊ शकत अस वक्तव्य करणाऱ्या मुश्रीफांच्या विधानात अहंकाराचा दर्प असल्याचं आरोप शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी केला आहे. आपल्या एका व्हिडीयोमध्ये त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर टिका करताना महायुतीच्या नेत्यांनी देवदेवतांचा अपमान थांबवून हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे.

Advertisement

पहा VIDEO >>> हिंदु देवदेवतांचा अपमान करण्याइतका अहंकार हसन मुश्रीफ यांना कुठून आला- संजय पवार

हसन मुश्रीफ यांनी सेनापती कापशी येथील प्रा. संजय मंडलिक यांच्या जाहीर प्रचार सभेला उपस्थिती लावली. महायुतीचे अनेक नेते असलेल्या या मंचावरून हसन मुश्रीफांनी संजय मंडलिकांच्या विजयाचे गणित मांडताना त्यांना आता कोणीही हरवू शकणार नसल्याचं म्हटलं. तसेच संजय मंडलिक यांना लोकांचा एव्हढा पाठींबा आहे कि त्यांना आता साक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या विधानाने राजकिय धुरळा उडाला असून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केलं जात आहे. आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी एक व्हिडीयो जारी करताना हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.

Advertisement

आपल्या व्हिडियोमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले, "काल हसन मुश्रीफांनी साक्षात हिंदु देवदेवता जरी आल्या तरी संजय मंडलिकांचा पराभव होणार नसल्याचं म्हटलं आहे. हसन मुश्रीफ हे देवतांना राजकारणात कशासाठी आणत आहेत ? त्यांचे हे विधान अहंकारातून झालं आहे. त्यांनी देवतांचा अपमान केला आहे. या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने गांभिर्याने लक्ष घातलं पाहीजे. अशी वक्तव्य करून हसन मुश्रीफ यांना समाजात जातीय तेढ निर्माण करायचा आहे काय ? निवडणुका येतील जातील पण हिंदू देवदेवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. " असा इशारा त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिला आहे.

Advertisement
Tags :

.