स्व. संजय नाईक यांचे प्रेरणास्थळ प्रत्येकासाठी दिशादर्शक ठरेल
पेंडूर येथे संजय नाईक यांचे प्रतिपादन ; पेंडूर येथे संजय नाईक यांच्या प्रेरणास्थळाचे लोकार्पण
कट्टा / वार्ताहर
सिंधुदुर्गं जिल्ह्यात स्वतःचा ठसा उमटविणारी जी अनमोल रत्न आहेत त्यापैकी एक रत्न म्हणजे संजय नाईक सर हे होय. पण हेच अनमोल रत्न परमेश्वराला देखील आवडल्याने त्याने हे रत्न आपल्यातून स्वतकडे बोलावून घेतले. परंतु नाईक सर हे एक अस काही रत्न होते जे विचारांच्या, कार्याच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरले आहेत. त्या विचाराने बऱ्याच काही समाजोपयोगी गोष्टी केल्या जातील. ज्या नाईक सरांनी प्रत्येक क्षेत्रात निस्वार्थपणे काम केले व ते करत असताना त्यांनी अनेक निस्वार्थी माणसे जोडली. ते सर्व नाईक सर प्रेमी व नाईक सर कुटुंबिय यांच्या माध्यमातून आज संजय नाईक सर यांचे पेंडुर गावात जे प्रेरणास्थळ निर्माण झाले आहे, त्या प्रेरणास्थळाच्या माध्यमातून होणारे सामाजिक कार्य व संजय नाईक सर हा एक विचार म्हणून महाराष्ट्रात पोहचतानाच ते निश्चितच प्रत्येकासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास पद्मश्री पुरस्कार प्राप्त परशुराम गंगावणे यांनी पेंडूर येथे बोलताना व्यक्त केला. खरारे पेंडूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि वराडकर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजचे माजी मुख्याध्यापक स्व. संजय नाईक सर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण आणि प्रेरणास्थळाचा लोकार्पण सोहळा शनिवार ८ मार्च रोजी महिला दीन व संजय नाईक सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पार पडला. त्यावेळी पद्मश्री विजेते परशुराम गंगावणे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साठविलकर, पेंडूर शाळा संस्था चेअरमन बाबराव राणे, ॲड. रुपेश परुळेकर, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, जेष्ठ उद्योजक मामा माडये, एम. के. गावडे, सुधीर वराडकर, महेश नाईक, संदेश नाईक, दीपा सावंत, शिवराम सावंत पटेल, दीपक पाटकर, मनमोहन वराडकर, दीपक गावडे, श्रावणी नाईक, वैष्णवी लाड, अश्विनी पेडणेकर, अंकिता सावंत, समृद्धी सरमळकर, बापू परब, डॉ. जी. आर. सावंत, पो. पा. स्वप्नील मेस्त्री, पंढरीनाथ नाईक, संजय वेतुरेकर, संदीप कदम, महेश बागवे, संजय पेंडुरकर, डॉ. सोमनाथ परब आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय नाईक कुटुंबीय यांच्यावतीने उपस्थितांचे मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले. तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थी व विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना उद्योजक दत्ता सामंत म्हणाले की स्वर्गीय संजय नाईक हे शिक्षण, राजकारण, सहकार अशा विविध क्षेत्रात वावरणारे व्यक्तिमत्व होते. सर्वाना सोबत घेऊन त्यांना प्रोत्साहन व सन्मान देऊन ते काम करायचे. समाजासाठी, लोकांसाठी काहीतरी केल पाहिजे या भावनेतून ते नेहमी काम करायचे. नाईक सर यांचे कार्य व विचारानुसार त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काम केल्यास ती खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. याच भावनेतून नाईक सर याच्या नावे ट्रस्ट सुरु करून काम करण्यात येत आहे, संजय नाईक यांचे स्मारक हे एक प्रेरणास्थळ असून ते जिल्ह्यातील आदर्श प्रेरणास्थळ म्हणून ओळखले जाईल, संजय नाईक यांच्या नावे स्थापन केलेल्या ट्रस्टला मालवण कुडाळ विधानसभा आमदार डॉ. निलेश राणे यांच्या मार्फत १ लाख रुपये व माझ्या तर्फे ५१ हजार रुपयेचा धनादेश आपण सुपूर्द करत आहोत, असे दत्ता सामंत यांनी जाहीर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना महेश नाईक यांनी संजय नाईक सरांनी विविध स्तरासाठी जे काम केले ते काम उल्लेखनीय आहे, मात्र नाईक सरांचे अपुरे राहिलेले काम संजय नाईक ट्रस्टच्या वतीने पूर्णत्वास नेले जाईल असे सांगितले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच पुतळ्याचे शिल्पकार प्रकाश तुरे, आर्किटेक्ट तेजस गोसावी, समीर रावले, स्मारक बांधकाम करणारे संतोष घाडी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एम. के. गावडे, अश्विनी आचरेकर, संजय वेतुरेकर, समीर चांदरकर, ॲड. रुपेश परुळेकर, संदीप कदम, बाबाराव राणे, कृत्तिका लोहार, ॲड. प्रदीप मिठबावकर यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव नाईक प्रास्ताविक डॉ. सोमनाथ परब तर आभार नाईक सर यांची कन्या सानिया नाईक यांनी मानले. छाया : विशाल वाईरकर