सतेज पाटील यांचं राजकारण फुटीच्या आधारावर ! मंत्री चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांवर जोरदार टिका
अभिजीत खांडेकर
आमदार सतेज पाटील हे भेद निर्माण करणारे असून त्यांना फुटीचं राजकारण करण्यात रस असल्याचा आरोप राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्या एकत्र येण्याने सतेज पाटलांना कोणती अडचण आहे अशी विचारणाही त्यांनी केली. कालपर्यंत मला पुरोगामी म्हणणाऱ्या माझ्या मित्रांना आता मी प्रतिगामी वाटत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्येक गावात महाराजांचं संपर्क कार्यालय काढू पहाणाऱ्या आमदार सतेज पाटलांना गावोगावी अजिंक्यताराच्या शाखा काढायच्या आहेत का असा सवाल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्धाटन आज कोल्हापूरात राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील य़ांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. महायुतीच्या या प्रचार कार्यालयाच्या उद्धाटनाला राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह महायुतीच्या घटकपक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावोगावी अजिक्यताराच्य़ा शाखा....
महायुतीच्य़ा कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला. सतेज पाटलांना आपले मित्र असे संबोधताना ते म्हणाले, कालपर्यंत माझ्या मित्रांना मी पुरोगामी वाटत होतो पण एका रात्री मी त्यांना नालायक वाटू लागलो. महाराज निवडूण आल्यावर गावोगावी संपर्क कार्यालय काढू पहाणाऱ्या सतेज पाटलांना सगळीकडे अजिंक्यताराच्या शाखा काढायच्या आहेत काय़ असा सवालही त्यांनी केला. अजिंक्यतारा हे आमदार सतेज पाटील यांचे संपर्ककार्यालय आहे.
सतेज पाटील यांच राजकारण फुटीचं...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी सतेज पाटलांवर थेट निशाणा साधला, ते म्हणाले सतेज पाटील हे भेदाच राजकारण करतात. मुश्रीफ आणि समरजीत घाटगे याच्यातील दिलजमाई त्यांना मान्य नाही. ते नेहमी फुटीच्या राजकारणाला प्राधान्य देतात. हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांनी एकत्र आलं तर सतेज पाटलांना काय अडचण आहे. असा सवालही त्यांनी केला.