पाच वर्षात मंडलिकांना बिंदू चौकात पाहिलेय का?- मालोजीराजे
कोल्हापूर : प्रतिनिधी
एकदा निवडून गेल्यानंतर मतदारसंघात राहू द्या; कोल्हापूरचे ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळख असलेल्या बिंदू चौकात खासदार संजय मंडलिक आलेले कुणी पाहिले का? असा सवाल मालोजीराजे छत्रपती यांनी गेला. अशा निक्रिय, अकार्यक्षम खासदार मंडलिकाना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, यावेळी ‘मान आणि मत गादीला आणि कायमचा रामराम मोदीला‘ ही घोषणा लक्षवेधी ठरली.
महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ बिंदू चौक परिसरातील महात गल्ली चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी महापौर नीलोफर आजरेकर, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी नगरसेविका जैबुनिस्सा सैय्यद, मौलाना अब्दुलसलाम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद डीगे, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणीभाई आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली.
कोल्हापुरात सत्ताधारी महायुतीचे ढीगभर नेते आहेत. पण त्यामानाने कोल्हापुरात विकास बघायलाही मिळाला नसल्याची खंत व्यक्त करुन मालोजीराजे म्हणाले, केवळ पोकळ घोषणा आणि डिजिटल पुरता विकास कोल्हापूरच्या जनतेच्या नशिबी आला आहे. लोकतंत्र आणि लोकशाहीचा खून करू पाहणार्या भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना आता घरी बसवले पाहिजे. शाहू छत्रपती खासदार म्हणून दिल्ली दरबारी कोल्हापूरच्या विविध प्रश्नांबाबत दिल्या जाणार्या पत्राला विशेष महत्व प्राप्त होणार आहे. राजकीय दहशतवाद गाडून टाकण्यासाठी शाहू छत्रपतींच्या रूपाने इंडिया आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावे.
माजी महापौर नीलोफर आजरेकर म्हणाल्या, राधानगरी धरणाच्या माध्यमातून जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यार्या राजर्षी शाहू महाराजांचे ऋण फेडण्याची संधी चालून आहे. शाहू छत्रपतींना निवडून देऊन या संधीचे सोने करूया.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सदानंद डिगे यांचेही मनोगत झाले. या सभेत बिंदू चौक रिक्षा मित्र मंडळ, न्यू स्टार फ्रेंड्स सर्कल म्हेतर समाजाच्यावतीने शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा जाहीर करण्यात आला.
यावेळी मुस्तफा मणेर, शाकीर शेख, अन्वर शेख, तय्यब महात, मेहबूब महात, विनोद पंडत, सचिन पंडत, रियाज कवठेकर, प्रशांत खा?s, सोनल घोटणे, रामभाऊ गुजर, गोपी प्रभावळकर, राजू जमादार, अल्ताफ महात, रतन हुलस्वार, रामा गुजर, सुधाकर पंडत, मलिक बागवान, विकी पंडत, रहीम महात, प्रशांत खाडे आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सिद्दीका पंडत यानी केले. सभेचे संयोजन अश्किन आजरेकर, आशपाक आजरेकर यांनी केले.