प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन; वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
अशोक पंडित यांनी इन्स्टाग्रामवर संजय गुप्ता यांच्या निधनाची बातमी शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. संजय हे उत्कृष्ट कथाकथन करणारे, उत्साही व्यक्तिमत्त्वाचे आणि चित्रपट निर्मितीची प्रचंड आवड असलेले दिग्दर्शक होते, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
संजय गुप्ता यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९६९ रोजी मुंबईत झाला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला ५७ वा वाढदिवस साजरा केला होता. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. 'कांटे', 'आतिश', 'जंग', 'मुसाफिर', 'जिंदा', 'दस कहानियाँ', 'शूटआउट अॅट वडाळा', 'काबिल', 'जज्बा' आणि 'मुंबई सागा' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत.
'शूटआउट ॲट लोखंडवाला', 'प्लॅन', 'वुडस्टॉक व्हिला', 'ॲसिड फॅक्टरी' आणि 'पंख' यांसारख्या चित्रपटांचे त्यांनी निर्माते म्हणून काम पाहिले होते. अभिनेता संजय दत्त यांच्यासोबतही त्यांनी अनेक चित्रपट केले. 'कांटे' (२००२), 'मुसाफिर' (२००४), 'जिंदा' (२००६) आणि 'शूटआउट ॲट लोखंडवाला' (२००७) हे त्यापैकी प्रमुख चित्रपट आहेत.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या कथा, दमदार ॲक्शन दृश्ये आणि शहरी जीवनाचे चित्रण ही त्यांच्या चित्रपटांची खास वैशिष्ट्ये होती. चित्रपटांव्यतिरिक्त त्यांना मोटारसायकलचीही विशेष आवड होती. मित्रांसोबत बाइक राइडला जाणे हा त्यांचा आवडता छंद होता.
संजय गुप्ता यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीने एक वेगळ्या शैलीचा चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक गमावला आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अशोक पंडित यांनी सांगितले.
