For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘किंग अँड क्विन’चा किताब संजय घोडावत ग्रुपला

05:18 PM Dec 08, 2024 IST | Radhika Patil
‘किंग अँड क्विन’चा किताब संजय घोडावत ग्रुपला
Sanjay Ghodawat Group wins the title of 'King and Queen'
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

गार्डन्स क्लब व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुष्पप्रदर्शनमध्ये शनिवारी झालेल्या पुष्प स्पर्धेत किंग ऑफ द शो व क्विन ऑफ द शोचा मान संजय घोडावत ग्रुपला मिळाला. तर मोठे क्षेत्रफळ 3 एकरपेक्षा अधिक संस्था व सार्वजनिक स्पर्धेतही संजय घोडावत विद्यापीठ चॅम्पियन ठरले.

महावीर उद्यानात प्रदर्शन सुरू असुन आज समारोप आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. दिवसभर विविध कार्यक्रम पार पडले. धनगरी नृत्य, भारूड, गाणी, लघुनाटीकाचे सादरीकरण झाले. स्कीट कॉम्पीटिशनमध्ये ‘आपली माती, आपले भवितव्य’ संकल्पनेअंतर्गत स्पर्धकांनी कला सादर करत जनजागृती केली. शनिवारी झालेल्या स्पर्धांचे आज सायंकाळी 5 वाजता बक्षिस वितरण होणार आहे. बक्षिस वितरणाने प्रदर्शनाची सांगता होणार आहे. गुलाबातील विविधता, कुंडीतील रोपे, सॅलेड डेकोरेशन, बोन्साय, फुले, पाने व पाकळ्यांची रांगोळी, बुके, मुक्त रचना, लॅन्डस्केपींग यांची मांडणी केली आहे.

Advertisement

फुलांचे संगोपन, झाडांचे संवर्धनासाठी गार्डन्स क्लब कार्यरत आहे. निसर्गप्रेमी आणि पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी गार्डन्स क्लब व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी केले. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वनविभागाकडून निसर्गप्रेमींसाठी काम करणाऱ्या संस्थेस मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मातीला जपलं नाही तर मोठ्या संकटाचा धोका आहे. सध्या प्रदुषणामुळे मातीचा पोत खराब होत आहे. याच्या जनजागृतीसाठी पुष्पप्रदर्शन भरवले आहे. मातीशी आपुलकी वाढावी, प्लास्टिकच्या दुष्परिणामाच्या जाणिवतेसाठी व्यासपीठ असल्याचे क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते गार्डन्स क्लबचे नियतकालिक रोजेट व दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

दुपारच्या सत्रात उद्यान विद्या व रोपवाटिका व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. धनगरी नृत्य, भारूड, गाणी, लघुनाटीकांचा समावेश होता. स्कीट कॉम्पीटिशमध्ये विविध विषयावर स्पर्धकांनी स्कीट्स सादर केली. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बिना जनवाडकर व रंगकर्मी संजय हळदीकर यांच्या हस्ते स्पर्धकांना गौरविण्यात आले.

बोटॅनिकल फॅशन शोमध्ये पाने, फुले, फळे, बिया, फळांच्या सालींचा उपयोग करून तरुणाईने वेशभूषांचा आविष्कार सादर केला. अनिता ढवळे व रितू वाधवाणी यांनी सूत्रसंचालन केले. रचना व प्राजक्ता चरणे यांनी आभार मानले.

यावेळी उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, खजानिस प्राजक्ता चरणे, शैला निकम, सुनेत्रा ढवळे, सुनिता पाटील, शशिकांत कदम, रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, सुभाषचंद्र अथणे, शांतादेवी पाटील, चित्रा देशपांडे, गौरव काइंगडे, सुमेधा मानवी, रघुनंदन चौधरी, रविंद्र साळोखे, संगीता कोकितकर, जयश्री कजरिया, दिपाली इंगवले, डॉ. स्मिता देशमुख, कल्पना सावंत आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.