कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या तालुकाध्यक्षपदी संजय गावडे

05:17 PM Mar 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

ओटवणे । प्रतिनिधी

Advertisement

अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी सरमळे येथील ओंकार प्रासादिक भजन मंडळाचे प्रसिद्ध भजनी बुवा संजय कृष्णा गावडे यांची निवड करण्यात आली आहे. अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाचे संस्थापक संजय ल गावडे, अध्यक्ष नारायण वाळवे, सेक्रेटरी प्रमोद टक्के यांनी ही निवड केली आहे. अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या कार्यकारणी बैठकीत पाच वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे. सरमळेवासीयांच्या आवाजाची शान असलेले बुवा संजय गावडे गेली २३ वर्षे भजन क्षेत्रात विद्यार्थीदशेपासूनच भजन व संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी भजन कलेची जोपासना करतानाच भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करीत भजन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक भजन स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गायक तसेच हार्मोनियम वादक पारितोषिके पटकाविली आहेत. डबलबारी क्षेत्रातही संजय गावडे यांनी गेल्या काही वर्षात आपला चाहता वर्ग निर्माण केला आहे. भजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांची अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी संजय गावडे यानी आपल्या या जडणघडणीत गुरुंसह या क्षेत्रांतील सहकारी तसेच तमाम संगीत व भजन तसेच डबलबारी रसिकांच्या प्रोत्साहनाचा आवर्जून उल्लेख केला.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article