For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संजय भोगटे यांची रुग्ण कल्याण समितीवर नियुक्ती

संजय भोगटे यांची रुग्ण कल्याण समितीवर नियुक्ती
Advertisement

कुडाळ/ वार्ताहर : कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण नियमंक मंडळ समिती सदस्यपदी जिल्हा परिषद माजी सदस्य संजय मुरारी भोगटे ( कुडाळ ) यांची नियुक्ती करण्यात आली.आमदार नीलेश राणे यांच्या शिफारशीनुसार सदर नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर श्री. भोगटे यांना सदस्य म्हणून समावेश करावा,असे पत्र आमदार नीलेश राणे यांनी या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाळके यांना दिले होते. त्यानुसार डॉ वाळके यांनी रुग्ण कल्याण समितीत श्री भोगटे यांची नियुक्ती केली. श्री भोगटे यांचा सामाजिक पिंड आहे.सामाजिक,आरोग्य विषयक उपक्रमात सहभागी होत असतात.आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी आवाज उठवून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. कुडाळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे पाच वर्षे त्यांनी जि.प..मध्ये नेतृत्व केले. या मतदारसंघातील विकासकामे आणि गोर गरिबाना उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जि.प.बांधकाम समिती सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. सावंतवाडी अर्बन को ऑपरेटिव्ह बँकवर संचालक म्हणून निवडून गेल्यानंतर चेअरमन ,व्हॉईस चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळला होता. माजी अध्यक्ष कुडाळ तालुका व्यापारी संघटचे अध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे माजी उपाध्यक्षपदही भूषविले आहे. जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.