For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आदित्य ठाकरेंच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे संजयबाबा घाटगे यांचे आवाहन

07:31 PM Jan 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
आदित्य ठाकरेंच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे संजयबाबा घाटगे यांचे आवाहन
Aditya Thakare
Advertisement

व्हनाळी वार्ताहर

शिवसेना (उबाठा) चे युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे आज महानिष्ठा यात्रेच्या निमित्ताने कोल्हापूर दौ-यावर येणार आहेत. त्यांचे कागल तालुक्यात जंगी स्वागत करण्यासाठी केनवडे फाटा आणि निढोरी येथे दु. ठिक 2.00 वाजता कार्य़कर्त्ये व शिवसैनिकांनी उपस्थीत राहावे. त्यानंतर गारगोटी येथे होणा-या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी केले.

Advertisement

केनवडे ता.कागल येथे श्री अन्नपुर्णा शुगर कारखाना कार्यस्थळावर शिवसेना (उबाठा)पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, तालुकाप्रमुख शिवगोंड पाटील,अशोक पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमास गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे,आप्पासोहेब पाटील,रणजित मुडूकशिवाले,दत्तोपंत वालावलकर,धनाजी गोधडे,धनराज घाटगे,नानासो कांबळे,विश्वास दिंडोर्ले,के.के.पाटील,मल्हारी पाटील,राजू भराडे, यांच्यासह शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.