For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इचलकरंजीत सफाई कर्मचाऱ्याचा दगडाने ठेचून खून, वस्त्रनगरी हादरली

11:35 AM May 20, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
इचलकरंजीत सफाई कर्मचाऱ्याचा दगडाने ठेचून खून  वस्त्रनगरी हादरली
ichalkaranji
Advertisement

इचलकरंजी : वस्त्रनगरी इचलकरंजी आज सकाळी पुन्हा एकदा हादरली. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील थोरात चौकात एका सफाई कर्मचाऱ्याचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Advertisement

शहरातील थोरात चौक परिसरात महापालिका सफाई कर्मचाऱ्याचा अज्ञातांकडून निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. विकी सुरेश अग्रवाल (रा. कामगार चाळ, सध्या शहापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस तपास सुरु आहे.

डोक्यात दगड घालून हत्या

Advertisement

महापालिका मालकीच्या कॉम्प्लेक्सच्या आवारात त्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना निदर्शनास आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळताच गावभाग पोलीस निरीक्षक महेश चव्हाण हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

 वाढती गुन्हेगारी

वस्त्रनगरी इचलकरंजी गेल्या काही काळापासून वाढत्या गुन्हेगारीमुळे त्रस्त आहे. मोकाट टोळ्या आणि त्यांचे म्होरके चांगलेच निर्ढावल्याचे अलीकडच्या घटनांमधून दिसुन येते. अलिकडच्या काही घटनांमध्ये परप्रांतिय मजुरांचे खून आणि त्यांच्यातील परस्परवाद यांचेही प्रमाण वाढलेले दिसते.

Advertisement
Tags :

.