सर्पदंशाने सफाई कामगाराचा मृत्यू
गोगटे जोगळेकरच्या मैदानावर स्वच्छतेदरम्यान दुर्घटना
त. भा. प्रतिनिधी
रत्नागिरी :
येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर साफसफाईचे काम करत असताना अत्यंत विषारी घोणस सापाने दंश केल्याने काशिनाथ लक्ष्मण गोताड (52, रा. फगरवटार) या नगरपरिषदेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर शहरवासीयांमधून तीव्र संताप व्यक्त आला. रत्नागिरी नगरपरिषदेच्या उद्यान विभागाचा हलगर्जीपणा आणि सुरक्षा साधनांचा अभाव यास कारणीभूत असून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रविवारी होणाऱ्या रत्नागिरी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जवाहर क्रीडांगणावर गुरुवारी भव्य मंडप उभारणी व तयारी सुरू होती. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून परिसराची स्वच्छता करण्याचे काम अवघ्या 20 दिवसांपूर्वीच ऊजू झालेल्या काशिनाथ गोताड यांच्याकडे सोपवण्यात आले होते. गुऊवारी दुपारी क्रीडांगणाच्या संरक्षण भिंतीशेजारील झाडी तोडत असताना, तेथे लपलेल्या विषारी घोणस सापाने त्यांच्या पायाला दंश केला. त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय ऊग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.