For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीच्या डावात सांगवानचे शतक

06:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीच्या डावात सांगवानचे शतक
Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

Advertisement

रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या सामन्यात यजमान मुंबईने दिल्लीला पहिल्या डावात 221 धावांत राखले. त्यानंतर मुंबईने दिवसअखेर 1 बाद 13 धावा जमविल्या. दिल्लीच्या डावात सनत सांगवानने दमदार शतक झळकविले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजीसमोर अधिक धावा जमविता आल्या नाहीत. याला अपवाद सनत सांगवान ठरला. सलामीला फलंदाजी करणाऱ्या सांगवानने 218 चेंडूत 2 षटकार आणि 11 चौकारांसह 118 धावा झळकविल्या. वैभव कांडपालने 86 चेंडूत 3 चौकारांसह 32 धावा जमविल्या. सांगवान आणि कांडपाल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 100 धावांची भागिदारी केली. कांडपाल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या मधल्या फळीतील फलंदाजांना मुंबईच्या गोलंदाजांनी फटकेबाजीपासून चांगलेच रोखले. प्रणव राजवंशीने 90 चेंडूत 6 चौकारांसह 39 तर राणाने 2 चौकारांसह 10 धावा जमविल्या. शतकवीर सांगवान सहाव्यागड्याच्या रुपात बाद झाला. 76.4 षटकांत दिल्लीचा डाव 221 धावांवर आटोपला. मुंबईतर्फे मोहीत अवस्थीने 62 धावांत 5 बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक : दिल्ली प. डाव सर्वबाद 221 (सांगवान 118, राजवंशी 39, कांडपाल 32, राणा 10, अवस्थी 5-62, तुषार देशपांडे व मुलानी प्रत्येकी 2 बळी), मुंबई प. डाव 3 षटकांत 1 बाद 13.

Advertisement

Advertisement
Tags :

.