For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगरूळच्या मैदानात शिवराज राक्षे शाहू केसरीचा मानकरी; पृथ्वीराज पाटीलचा भारत मदनेवर रोमहर्षक विजय

03:34 PM Mar 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
सांगरूळच्या मैदानात शिवराज राक्षे शाहू केसरीचा मानकरी  पृथ्वीराज पाटीलचा भारत मदनेवर रोमहर्षक विजय
Advertisement

किरण भगत कडून सत्यांदर कुमार चित; भव्य दिव्य नियोजनाला कुस्तीशौकीनांची उस्फुर्त दाद

सांगरुळ /वार्ताहर

येथील माजी उपसरपंच पैलवान सुशांत नाळे व छत्रपती शाहू (नाळे) तालीम मंडळ सांगरुळ यांचे वतीने आयोजित केलेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात डबल महाराष्ट्र केसरी पै. शिवराज राक्षे ( आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे ) यांने भारत केसरी पै. सोनू कुमार (हरियाणा) याच्यावर दुसऱ्या मिनिटाला एकेरी पट काढून प्रेक्षणी विजय मिळवला व शाहू केसरी किताबाचा मानकरी ठरला . प्रथम क्रमांकाच्या दुसऱ्या लढतीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (देवठाणे ) यांने मुंबई महापौर केसरी पै भारत मदने ( गोकुळ वस्ताद तालीम पुणे )याच्यावर सहाव्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर चटकदार विजय मिळवत आबाजी केसरी किताबाचा मानकरी ठरला . द्वितीय क्रमांकाच्या लढतीत उपमहाराष्ट्र केसरी पै किरण भगत ( आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे) याने हरियाणा केसरी पै .सत्येंद्र कुमार याच्यावर दुसऱ्या मिनिटाला विजय मिळवत व्हील्स केसरी किताब पटकाविला . मैदानातील प्रमुख तीनही कुस्त्या झटपट निकाली झाल्याने प्रेक्षकांनी समाधान व्यक्त केले .

Advertisement

. पै शिवराज राक्षे व पै . सोनू कुमार यांच्यातील लढतीला आमदार प्रा जयंत आसगावकर मा आ .चंद्रदीप नरके विश्वासराव पाटील बाबासाहेब पाटील सुशांत नाळे अजित नरके यांच्या प्रमुख उपस्थितीत संध्याकाळी ठीक १० .२० मिनिटांनी प्रारंभ झाला . सलामीलाच शिवराजने सोनू कुमार ला एकेरी पट काढून खाली घेतले व त्याला चिटपट केले .शिवराज ला तीन लाख रोख इनामासह राजर्ष शाहू केसरी किताबाने सन्मानित करण्यात आले.

पै पृथ्वीराज पाटील व पै . भारत मदने यांच्यात झालेली प्रथम कमांकची दुसरी लढत अतिशय रोमहर्षक झाली. दोन मिनिटाच्या खडाखडीनंतर भारतने हाप्ते भरण्याचा प्रयत्न केला . तो फोल ठरवत चौथ्या मिनिटाला डुबडाव टाकत पृथ्वीराजने भारतचा ताबा घेतला .पाचव्या मिनिटाला पोकळ घिस्सा डावावर पृथ्वीराजने भारतला चितपट केले.

Advertisement

द्वितिय क्रमांकाच्या लढतीत पै किरण भगतने पै सत्येंद्र कुमार यांच्यातील लढतीत एक मिनिटाच्या खडाखडीनंतर सत्येंद्र कुमारने
आक्रमक होत किरण भगतचा एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला किरण भगतने तो धडकवून लावत सत्येंद्र कुमारचा ताबा घेतला व घिस्सा डावर तिसऱ्या मिनिटाला त्याला आसमान दाखविले.

तीन नंबरच्या कुस्तीत सुरज मुंढे (शाहू कुस्ती केंद्र) याने सतपालनाग टिळकला (गंगावेश) घुटना डावावर पाचव्या मिनिटाला चितपट करत कै.दादू खाडे केसरीची गदा पटकावली.

चार नंतरच्या कुस्तीत सनिकेत राऊत कुंभी संकूल याने घुटना डावावर चितपट करत काळम्मा केसरीची गदा पटकावली.
पाच नंबरच्या कुस्ती मध्ये प्रवीण पाटील (कुंभी संकुल)याने हल्ली कुमारला ढाक मारून पराभूत केले.प्रवीण कुमारला सोनाई केसरी किताब देण्यात आला.सहा नंबरच्या कुस्तीमध्ये भगतसिंग खोतने (कुंभी संकुल) एकलंगी डावावर मुबारक अली(सांगली) याला चितपट करत बाऊचकर केसरी किताब पटकावला.

सांगरुळ मधील मल्लांच्या झालेल्या प्रेक्षणिय कुस्त्यांमध्ये धैर्यशील लोंढे (सांगरूळ) याने प्रमोद भोईटे (इंचलकरजी) याला एकेरी पट काढून चितपट करत शाहू केसरीची गदा पटकावली.हर्षद कापडे (सांगरूळ)याने करण सरडे याला पराभूत करून स्वराज्य केसरीची गदा पटकावली. सुजल मगदूम याने आकाश खोत याला झोळी डावावर चितपट केले. अनुज घुंगुरकर यांने विक्रम महापूरे याचेवर तर आदर्श नाळे यांने वरद हिरवे याचेवर चटकदार विजय मिळविला.

यावेळी केडीसीसीचे संचालक बाबासाहेब पाटील गोकुळचे संचालक अजित नरके कुंभी कासरी साखर कारखान्याचे व्हा . चेअरमन विश्वास पाटील (कोगेकर) यांचे सर्व संचालक पैलवान निवास वातकर राहूल खाडे पैलवान लाचलुचपत कोल्हापूर विभागाचे
पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे महेश संकपाळ, भगवान लोंढे, कृष्णात खाडे, कुंभीचे संचालक रविंद्र मडके प्रकाश पाटील, तानाजी पाटील, सदाशिव खाडे कुंभी बँकेचे संचालक प्रदीप नाळे, विलास नाळे, सर्जेराव नाळे यांच्यासह कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंच म्हणून पै गुंडाजी पाटील पै सर्जेराव पाटील पै रघुनाथ मोरे पै बाजीराव पाटील पै बाबा शिरगांवकर पै आण्णा नाळे दत्ता नाळे गजानन यादव यांनी काम पाहिले. .निवेदन पै .यशवंत पाटील दोनवडेकर व नागनाथ नाळे यांनी केले.

भव्य आणि दिव्य नियोजन
कुस्ती मैदानासाठी सांगरुळ बाजारवाडा येथे भव्य चौकात कै.पै भिवा लहू नाळे कुस्ती आखाडा तयार करण्यात आला होता .सांगरूळ येथील कुस्ती मैदान म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्ती शौकीनांचे लक्ष वेधणारे.रविवारी याची प्रचिती पुन्हा आली. लाखोंची बक्षिसे आणि सुयोग्य नियोजन, लक्षवेधी प्रकाश झोतामुळे मैदानावर झगमगाट होता.या मैदानावर हजारो कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती.

रेकॉर्ड ब्रेक गर्दीने मैदान अपुरे
शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील व किरण भगत कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात एकाच आखाडयात प्रथमच लढणार असल्याने या कुस्ती बदल परिसरात जोरदार वातावरण निर्मिती झाली होती . यामुळे मैदानात कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती .सायंकाळी मैदान खचाखच भरले होते ..मैदानाच्या परिसरातील सर्व घरांच्या बालकणी व छतावर बसून कुस्तीशौकीन कुस्तीचा आस्वाद घेत होते .

प्रेक्षणीय कुस्त्या
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे मैदान असलेल्या या मैदानावर लहान कुस्त्या पासून एक नंबरच्या कुस्ती पर्यंत कुस्ती शौकीनांच्या नजरा मैदानावरील लढतीकडे लागलेल्या होत्या.आतुरतेने कुस्ती बघणाऱ्या कुस्ती शौकीनांना पैलवानांनी प्रेक्षणीय लढती करून वाहव्वा मिळवली.

वयाची ७५गाठलेल्या पैलवानांचा सत्कार
वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेले गावातील ज्येष्ठ पैलवान दत्ता नाळे,ज्ञानदेव नाळे,गणपती नाळे आदी मल्लांचा सत्कार करण्यात आला .

Advertisement
Tags :

.