For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगोल्डा सरपंचांविरोधात अविश्वास ठराव; उपसरपंचांसह चार सदस्यांचा पुढाकार

05:22 PM Sep 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
सांगोल्डा सरपंचांविरोधात अविश्वास ठराव  उपसरपंचांसह चार सदस्यांचा पुढाकार
Advertisement

बार्देश : सांगोल्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनोलेट लोपेस यांच्याविरोधात उपसरपंच उल्हास मोराजकर यांच्यासह चार सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या संदर्भातील नोटीस बार्देश येथील गटविकास अधिकारी तथा सक्षम प्राधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहे.

Advertisement

सदस्यांनी सादर केलेल्या नोटिशीत सरपंचांविरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी विशेष बैठक बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे. गोवा पंचायत कायद्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करून अविश्वास ठराव विचारार्थ घेण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

या अविश्वास ठरावामुळे सांगोल्डा ग्रामपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता सक्षम प्राधिकाऱ्यांकडून या नोटिशीवर कोणती कार्यवाही केली जाते आणि अविश्वास ठरावासाठी बैठक कधी बोलावली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.