सूरज बडजात्यांकडून ‘संगमरमर’ सीरिज
सूरज बडजात्या यांच्या राजश्री प्रॉडक्शन्सकडून सादर वेबसीरिज ‘संगमरमर’चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा पारिवारिक ड्रामा प्रेम अन् कर्तव्य तसेच अतूट नात्यांच्या थीमवर आधारित आहे. जियो हॉटस्टारवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे.
टीझरमध्ये एका दांपत्याविषयी दाखविण्यात आले असून ते परस्परांच्या प्रेमात हरवून गेले असून स्वत:च्या आयुष्यात अत्यंत आनंदी आहेत. सूरज बडजात्या यांच्या कहाण्यांच्या वैशिष्ट्याने प्रेरित ‘संगमरमर’ भारतीय परिवारांचे परस्पर संबंध आणि नात्यांना दीर्घकाळापर्यंत कायम टिकविण्याच्या शांत शक्तीला दर्शविणारा आहे. जियो हॉटस्टारने हा टीझर स्वत:च्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. तसेच याच्या कॅप्शनदाखल ‘ही कहाणी प्रेमाची नव्हे तर जबाबदारी अन् प्रतीक्षेची आहे’ असे नमूद करण्यात आले आहे. विक्रम घईकडून दिग्दर्शित या सीरिजमध्ये शीन सविता दास आणि सौरभ राज जैन हे मुख्य भूमिकेत आहेत. तर याचबरोबर सीरिजमध्ये स्मिता बंसल, खालिद सिद्दीकी, फारुक सईद, जया ओझा आणि अविनाश वधवानी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येतील.
ही कहाणी एका महिलेच्या वैयक्तिक प्रवासाला दर्शविणारी आहे. यात रोमान्स, जबाबदारी आणि वेळ अन् अंतराच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या भावनातमक बंधनांवर जोर देण्यात आला आहे. ही कहाणी व्यक्त न केलेले भाव, मौन आणि प्रेमाभवती गुंफण्यात आली आहे. बडजात्यांची ही सीरिज लवकरच प्रेक्षकांना पाहता येणार आहे.