Sangli News | सांगलीचा हरभट रोड ‘जाम’; मालवाहतूक वाहनांमुळे नागरिक त्रस्त
सांगली : शहरातीलप्रमुख आणि वर्दळीचा मार्ग असलेल्या हरभट रोडवर दररोज सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळी साधारणपणे ६ नंतर या मार्गावर मालवाहतूक वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो आणि अनेकदा वाहनांच्या लांबच लांब रांगालागतात.
हरभट रोड हा शहरातील महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ असते. त्यातच सायंकाळच्या वेळेत दुहेरी मार्गाने होणारी वाहतूक, वाढलेली वाहनांची संख्या आणि मालवाहतूक वाहनांची मोठी वर्दळ यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. परिणामी नागरिकांना कोंडीत अडकून बराच वेळ घालवावा लागत आहे. मालवाहतूक वाहनांमुळे कोंडीत भर हरभट रोडवर सायंकाळीसहानंतर मोठ्या प्रमाणात मालवाहतूक गाड्यांची ये-जा सुरू असते. अरुंद रस्त्यावरून मोठी वाहने ये-जा करत असल्याने इतर वाहनांना मार्ग काढणे कठीण होते. त्यामुळे काही वेळातच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या कोंडीचा परिणाम परिसरातील नागरिक, दुकानदार, दुचाकीस्वार, चारचाकी वाहनचालक तसेच पादच्द्मयांवर होत आहे.
एकेरी वाहतूक करण्याची मागणी
वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हरभट रोडवरील वाहतूक ठराविक वेळेतएकेरी मार्गाने करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. एकेरी वाहतूक व्यवस्था केल्यास वाहनांची गर्दी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. तसेच माधवनगर पुलाकडून येणाऱ्या मोठ्या मालवाहतूक वाहनांना वळविण्याची अथवा पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गावरील वाहनांचा ताण कमी होऊन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
बाहतूक कोंडीमुळे केवळ वेळेचा अपव्यय होत नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा, सततची गर्दी आणि अरुंद मार्गामुळे अपघाताचा धोका बाढत आहे. विशेषत? पादचारी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे वाहतूक शाखेने हरभट रोडवरील वाहतूक व्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन योग्यनियोजन करावे, अशी मागणी होत आहे. बाहतूक पोलिसांची अतिरिक्त नियुक्ती, मालवाहतूक वाहनांसाठी वेळेचे नियोजन, एकेरी वाहतूक व्यवस्था आणि पर्यायी मार्गाचा वापर याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी बाहतूक शाखेने तात्काळ योग्य नियोजन करून हरभट रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केली आहे.