गडकोट जागातिक वारसा ठरविण्यासाठी सांगलीचा हातभार
सांगली :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. २०२४-२५ या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर केला आहे. यात किल्ले रायगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, खडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या १२ किल्ल्यांचा समावेश आहे, यासाठी किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्याचे काम सांगलीतील हरिपूर येथील इंटरनॅशनल मॉडल मेकर रमेश बलुरगी यांनी केले आहे. वारसा स्थळांचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय यांनी सादर केला असून तो संमत झाला तर एका सांगलीकर कलाकाराचे महत्वाचे योगदान ठरणार आहे.
मॉडेल मेकिंगमधून सांगली ते दिल्लीपर्यंतचा यशाचा प्रवास करणाऱ्या रमेश मारुती बलुरगी या हरिपूर गावात शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीचा संघर्ष मोठा आहे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा नं-१ हरिपूर व माध्यमिक शिक्षण श्रीमती कोंडाबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल येथे झाले. बहीण महानंदा यांची प्रेरणा आणि शिक्षणापेक्षा चित्रकलेवर भर असल्याने ८ वीमध्ये असताना एलिमेंटरीची परीक्षा दिली. यामध्ये मला ए ग्रेड मिळाला. नंतर ९ वी मध्ये दुसरी इंटरमिजिएट परीक्षा दिली. त्यामध्ये जिल्ह्यात पहिला आला तेव्हाच त्यांचा आत्मविश्वास वाढला. कोल्हापूर येथे दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मेहनत, चिकाटी कलेमधील नवनिर्मिती पाहून प्रिन्सिपल अजय दळवी यांनी आर्थिक, मानसिक आधार दिला. आर्ट टिचर डिप्लोमाचे शिक्षण सांगली येथील कला विश्व महाविद्यालय या ठिकाणी घेतले. परिस्थितीने पुढचे शिक्षण थांबले. काहीतरी वेगळं करून दाखवावे म्हणून रमेश यांनी ग्लास पेंटिंगवर प्रभुत्व मिळवायचे ठरवले.
गडकोट जागातिक वारसा ठरविण्यासाठी सांगलीचा हातभार पान १ वरून ग्लासवर उलट्या बाजूने पेंटिंग करणे खूप अवघड कला होती. त्याचे त्यांनी प्रदर्शन भरवण्याचे ठरविले त्यासाठी ५० ग्लास पेंटिंग तरी हवे. त्यासाठी लागणारा खर्च खूप मोठा होता. म्हणून हरिपूर येथे पतसंस्थेत कर्ज काढून पेंटिंग तयार केले. २००२ या वर्षात भारती विद्यापीठ येथे प्रदर्शन स्वतःच्या हिमतीवर भरविले. प्रदर्शनामध्ये खूप कौतुक झाले पण दोनच पेंटिंग विक्रीस गेली. कर्जाचे ओझे घेऊन फोटोग्राफी चालू केली. त्यात पण यश मिळाले नाही. परत मॉडर्न आर्ट कॅनव्हास पेंटिंग करू लागले. पुणे, मुंबई या ठिकाणी विक्रीस थोडेफार जाऊ लागले. पण म्हणावे तसे यश मिळत नव्हते. असेच संघर्ष करत फोटोशॉप, फोटोग्राफी, स्क्रीन प्रिंटिंग, या सर्व गोष्टी केल्या. त्यावेळेस एक टर्निंग पॉईंट आला मोटिवेटर संदीप माहेश्वरी यांचा एक व्हिडिओ पाहिला त्यात रमेश यांना असे जाणवले की तुमच्या कामांमध्ये जर मेहनत आणि जिद्द असेल तर त्यात आपण यश मिळवू शकतो. आर्टिस्ट खूप जण आहेत त्यात टिकाव लागणार नाही. पण मॉडेल मेकिंग क्षेत्रात कोणी येत नाही आपण उतरु.
रमेश बलूरगी सांगतात तीन वर्ष खूप कष्ट करायचे असे ठरविले. सांगली जिल्ह्यात जेवढे आर्किटेक्ट आहेत त्यांना जाऊन भेटलो. मॉडेलबद्दल माहिती दिली. सहा महिन्यांनी आर्किटेक प्रमोद चौगुले यांनी पहिला ब्रेक दिला. मन लावून त्यांना छान सुंदर मॉडेल तयार करून दिले. कालांतराने त्यांनीच खूप काम दिले. अगोदरच्या मॉडेलमध्ये झालेल्या चुका सुधारत मॉडल मेकिंग क्षेत्रात नाव कमविले. आतापर्यंत रमेश आणि दीडशेहून अधिक मॉडेल्स तयार केले, अचानकच एकदा त्यांना मंत्रालयातून कॉल आला.
आपणास किल्ल्यांचे मॉडेल तयार करायचे आहे. तुम्ही कधी किल्ले केले आहेत का? प्रामाणिकपणे किल्ले केले नाहीत पण काम मिळाले तर त्यांना मी स्पष्ट म्हणालो अजून तर काही केले नाही पण काम मिळाल्यानंतर तुमच्या अपेक्षा चांगले काम करून दाखवेल अशी त्यांनी गॅरंटी दिली. तिकडून उत्तर आले, तुमच्याकडून आम्हाला हेच उत्तर हवं होतं. आम्ही तुमचे मॉडेल्स पाहिले आहेत. खूप प्रमाणबद्ध चांगले आहेत. शिवाय तुमची कला अप्रतिम आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पेंटिंगचे ज्ञानही आहे म्हणून आम्ही तुमचे नाव सुचविले. सुरुवातीस दोन मॉडेल्स तयार करायचे आहेत विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. पुढे हे काम वाढत गेले आणि बारा दुर्ग जागतिक वारसास्थळांच्या कमिटीला पाहण्यासाठी तयार झाले. वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर या कामाला आणि मॉडेल बनवणाऱ्यालाही अधिकचे महत्व प्राप्त होणार आहे. जिद्दीच्या जोरावर किती मोठी झेप घेता येऊ शकते त्याचे एक आगळे वेगळे उदाहरण ठरले आहे.