For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | सांगलीच्या आलिया मुजावरची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उत्तुंग भरारी; नेपाळमध्ये पटकावले कांस्यपदक!

04:17 PM Jun 12, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीच्या आलिया मुजावरची आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उत्तुंग भरारी  नेपाळमध्ये पटकावले कांस्यपदक
Advertisement

सांगली : नेपाळची राजधानी काठमांडू येथे २ ते ४ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या १७व्या एनएसकेए आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये कु. आलिया नजीरहुसेन मुजावर हिने उल्लेखनीय कामगिरी करत 'काता' प्रकारात तृतीय क्रमांक पटकावून भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली.

Advertisement

तीन देशांच्या सहभागातून पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत आलियाने आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय सारावर यश संपादन केले. तिच्या या यशामुळे भारतासह सांगली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.आलिया मुजावरच्या या यशामागे ट्रेडिशनल कराटे डो असोसिएशनचे प्रशिक्षक हमजेखान मुजावर, साहिल सर, ओजस सर आणि अंकुर सावंत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणाखालीमुजावर, सातत्यपूर्ण सराब आणि मेहनतीच्या जोरावर आलियाने हे यश मिळवले.

आलियाच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरांतून तिचे अभिनंदन होत असून, भविष्यातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ती देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.