For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशोत्सवासाठी सांगलीकर सज्ज....

05:57 PM Aug 22, 2025 IST | Radhika Patil
गणेशोत्सवासाठी सांगलीकर सज्ज
Advertisement

सांगली / सचिन ठाणेकर :

Advertisement

गेले चार दिवस सांगलीकर महापुराच्या सावटाखाली होते. परंतु आता पाणी ओसरण्यास सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. शहरात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. गणेशोत्सव आता अवघ्या चार दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे सांगलीकरांना आता गणरायाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. राध्या शहरातील अनेक विक्रेत्यांच्या स्टॉलवर सजावट साहित्य, मखरे मंदिरे, गणेशमुर्ती आदींची रेलचेल असून, भाविकांकडून त्यांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे.

सांगलीत महापुराच्या धास्तीने भाविकांसह व्यापाऱ्यांना गणेशोत्सव कसा साजरा होईल, याची चिंता लागून राहिली होती. परंतु गुरूवारी सायंकाळी पाणी पातळी स्थिर होवून रात्रीपासून पाणी ओरारण्यास सुरुवात झाल्याने सांगलीकरांना दिलासा मिळाला.

Advertisement

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक मूर्तीकारांच्या कार्यशाळेत सार्वजनिक गणेशमूर्तीचे ९० टक्क्यांहून अधिक बुकिंग झाले आहे. या कार्यशाळेत लहान एक फुटाच्या गणेशमूर्तीपासून ते १५ ते २० फुटी मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. येथे सार्वजनिकसह घरगुती गणपतींसाठीही बुकींग सुरु असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले.

सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने समाज जागरुक झालेला असल्याने, यंदा शाडूला जास्त मागणी असल्याचे सांगण्यात आले. परंतू शाडू महाग आहेच, शिवाय शाडूच्या मूर्ती तयार करणे वेळखाऊ असल्याने, मुर्तीकारांकडून प्लास्टरमुर्ती बनवण्याकडेच जारत कल आहे. काही ग्राहकांच्या व सार्वजनिक मंडळांच्या मागणीनुसार त्यांना विसर्जनासाठी शाडूची मुर्तीही घडवून दिली जात आहे.

किरकोळ विक्रेत्यांनीही यंदा मोठ्या प्रमाणावर मुर्ती खरेदी केल्याचे सांगण्यात आले. प्लारटर पर्यावरणास घातक असल्याने, गेल्या काही वर्षांपासून शाडूच्या मूर्तीस जारत प्राधान्य दिले जात आहे. ही पर्यावरणदृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे थोड्या महाग असल्यातरी ग्राहकांनी शाडू मुर्तीसच प्राधान्य देणे गरजेचे आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले.

शहरातील दत्तमारूती रोड, बालाजी चौक, पुष्पराज चौक, विश्रामबाग परिसर आदी ठिकाणी मूर्ती विक्रेत्यांचे स्टॉल सजले आहेत. या स्टॉलवर साध्या बैठकीची मूर्ती, शंकर रुपातील, नागाच्या फणीवरील, पिंडीवरील, दगडूशेठ, फेटेधारी दगडूशेठ, सिंहासनाधीश, लालबागचा राजा, शेतकरी रुपातील, उंदरावरील आदी विविध प्रकारातील गणेशमुर्ती विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. एक फुटी गणेशमुर्तीचे दर ४०० रुपयांपासून पुढे असून, ५ फुटी मूर्तीचे दर ७००० रुपयांच्या पुढे असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

बाजारात गणेश मुर्तीबरोबरच आरारा, सजावट, पुजा साहित्य, मंदिरे मखरे आदींचेही स्टॉल बहरले आहेत. शहरात विविध प्रकारची इकोफ्रेंडली व फोल्डींगची आकर्षक मंदिरे बाजारात आली असून, यामध्ये पुड्यांची, लाकडी, कागदी, कापडी, प्लास्टीक आदी विविध प्रकारांमध्ये ही मंदिरे उपलब्ध आहेत.

सुंदर वेलवेट, आरसे, टिकल्या, आकर्षक लेस, आदी विविध प्रकारांनी हि मंदिर मखरे सजली आहेत. गेल्या पाच सहा वर्षांपासून थर्माकोलवर बंदी आल्याने अशी मंदिरे बाजारातून हद्दपार झाल्याचे विविध प्रकारची इकोफ्रेंडली व फोल्डींगची आकर्षक मंदिरे बाजारात आली असून, यामध्ये पुठ्यांची, लाकडी, कागदी, कापडी, प्लास्टीक आदी विविध प्रकारांमध्ये ही मंदिरे उपलब्ध आहेत.

सुंदर वेलवेट, आरसे, टिकल्या, आकर्षक लेस, आदी विविध प्रकारांनी हि मंदिर-मखरे सजली आहेत. गेल्या पाच सहा वर्षांपासून थर्माकोलवर बंदी आल्याने अशी मंदिरे बाजारातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. त्याजागी फोमची, कागदी, कापडी, लाकडी मंदिरे दिसून येत आहेत. ती थोडी महाग असली तरी फोल्डींगची असल्याने वर्षानुवर्षे वापरात येण्यासारखी आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून त्यांना चांगली मागणी आहे. शिवाय बाजारात गणेशोत्सवासाठी विविध फुलांचे प्रकार, मोरपीस, विविध प्रकारची फळे, पुजासाहित्य, आरती संग्रह आदींचीही रेलचेल बाजारात दिसून येत आहे.

  • मंडळांकडून मंडप उभारण्याची लगबग

शहरातील अनेक सार्वज्चनक मंडळांचीही आता मोठी लगबग सुरू झाली असून, मंडप उभारणी, सजावट, देखावे आदींची कामे उत्साहात सुरू आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरात यंदाही गणेशोत्सव दणक्यात साजरा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.