For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Youth Died in Swimming Tank पर्यटनासाठी गेलेल्या ईश्वरपूरच्या २५ वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये डोकं आपटून मृत्यू

04:55 PM Jun 27, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
youth died in swimming tank पर्यटनासाठी गेलेल्या ईश्वरपूरच्या २५ वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये डोकं आपटून मृत्यू
Advertisement

पर्यटनासाठी मित्रांसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे गेलेल्या सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथील २५ वर्षीय तरुणाचा रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारताना दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे ईश्वरपूरसह संपूर्ण सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

मृत तरुणाचे नाव श्रेणिक मिलिंद टाकळे (वय २५, रा. ईश्वरपूर, ता. वाळवा) असे असून त्याचे मूळ गाव कसबा सांगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेणिक हा सांगली जिल्ह्यातील सुमारे दहा मित्रांसोबत मालवण येथे पर्यटनासाठी गेला होता. वायरी येथील एका रिसॉर्टमध्ये पोहत असताना त्याने सुमारे ८ ते १० फूट उंचीवरून स्विमिंग पूलच्या अवघ्या ४ फूट खोलीच्या भागात उडी मारली. त्यामुळे त्याचे डोके तळाशी आपटून गंभीर दुखापत झाली. मित्रांनी त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Advertisement

या प्रकरणी मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. श्रेणिक हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या विवाहाची चर्चा सुरू असतानाच घडलेल्या या दुर्दैवी घटनेने ईश्वरपूर आणि परिसरावर शोककळा पसरली आहे.

Advertisement
Tags :

.