Sangli Crime | सांगली हादरली! १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६४ वर्षाच्या वृद्धाकडून अत्याचार; पीडिता गरोदर राहिल्याने प्रकार उघड!
६४ वर्षीय वृद्ध नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल!
सांगली -एका ओळखीच्या महिलेच्या मुलीला खाऊचे आणि पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर गेल्या सहा ते सात महिन्यापासून लैंगिक अत्याचार करण्यात आला. या अत्याचारातूनही १७ वर्षाची मुलगी गरोदर राहिल्यानंतर या प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या संशयित सुधीर नाईक (वय ६४ रा. बडर कॉलनी, मार्केट यार्डजवळ सांगली) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की सुधीर नाईक हा ६४ वर्षाचा असून त्याच्या पत्नीचे पाच वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्याची या तरुणीच्या आईबरोबर ओळख होती. त्या ओळखीतून ही तरुणी नाईक यांच्या घरी येत होती. त्याच दरम्यान नाईक याने या तरुणीला खाऊचे आणि पैशाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार ऑक्टोबर २०२५ च्या दरम्यान सुरू झाला. यातून सातत्याने या तरुणीवर अत्याचार होत राहिला. यातच ती गरोदरराहिली. दोन दिवसापूर्वी या तरुणीच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तीला डॉक्टरकडे दाखवण्यात आल्यावर हा प्रकार समोर आला. त्यानंतर तत्काळ याची माहिती विश्रामबाग पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी याप्रकरणी या तरुणीच्या आईची फिर्याद घेतली आणि त्यानुसार सुधीर नाईक याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. बुधवारी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता नाईक या करत आहेत