सांगली हादरली! नोकरीला जाणाऱ्या महिलेचा भररस्त्यात विनयभंग
सांगलीत महिलेला पाठलाग करून विनयभंग
सांगली: अगोदरची ओळख असल्याचा फायदा घेऊन परगावाहून नोकरीच्या निमित्ताने सांगलीत येण्प्रया महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पिडितेने सांगली शहर पोलीसात संशयित फत्तेसिंह परमार (वय ४५, रा. आकाशवाणी जवळ दिव्या हॉटेल समोर, सांगली) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावातून पीडित महिला नोकरीच्या निमिताने दुचाकीवरून सांगलीत ये जा करते. सोमवारी १३ रोजी सकाळी सब्बा आठ वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला सांगलीत येत असताना कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीपासून संशयित फत्तेसिंह परमार याने तिचा पाठलाग केला.आमराईजवळ आल्यानंतर पीडित महिलेला गाडी थांबवण्यास सांगितले.
काय गाडी नवीन घेतली काय?, असे विचारले. त्यानंतर जुने काम विसरला काय असे म्हणून त्याने जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर पीडित महिलेने त्वरित शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित परमार याच्याविरुद्ध तक्रार केली आहे. तिच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी परमार याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.