For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | सांगली हादरली! ८ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; सराईत गुन्हेगार छोट्या बाबरवर गुन्हा दाखल

02:56 PM May 03, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   सांगली हादरली  ८ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार  सराईत गुन्हेगार छोट्या बाबरवर गुन्हा दाखल
Advertisement

                              सांगलीत ८ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

सांगली
-आठ वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करत लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दोन दिवसापूर्वी पीडित बालिकेच्या आईचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला. त्यावेळी पीडित बालिकेने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली आणि सर्वांना धक्का बसला. हे कृत्य छोट्या उर्फ विक्रांत शंकर बाबर (रा. सुतार प्लॉट, एसटी स्टैंड मागे, बाबर चाळ, सांगली) याच्यावर बलात्कार आणि सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन ते तीन दिवसांपूर्वी उष्मा असल्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून आपल्या लहान मुलीबरोबर एक महिला घरात बसली होती. त्यावेळी तिची मोठी पंधरा वर्षीय मुलगी कॉटवर झोपलेली होती. या दरम्यान त्यांच्या घरासमोरून आलेला संशयित छोट्या बाबर हा कॉटवर झोपलेल्या मुलीकडे पाहू लागला. त्यावेळी त्या मुलीच्या आईने रागाने घराचा दरवाजा बंद करून घेतला. याचा राग आल्याने बाबर याने त्या महिलेला शिवीगाळ केली. माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत.

मला हो म्हण, तू आली नाहीस तर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून बाबरने गोंधळ घातला. यामुळे त्या ठिकाणी पीडित महिलेची लहान मुलगी जोराने रडायला लागली. त्यावेळी त्या महिलेने आपल्या मुलीकडे का रडतेस, अशी विचारणा करून चौकशी केली असता तिने आपल्या बाबतीत बाबरने केलेले कृत्य सांगितले.
पीडित मुलगी तिच्या वयाच्या मुलीबरोबर खेळत असताना तिला बाबरने ओढून घराकडे नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्या दिवशी घडलेल्या त्या प्रकारामुळे पीडित मुलगी अद्याप घाबरलेली दिसत होती. आपल्या मुलीच्या बाबतीत संशयीताने केलेले कृत्य समोर येताच संबंधित महिलेने शहर पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी फिर्याद घेऊन सराईत गुन्हेगार छोट्या बाबर याच्या बीएनएस ६५(२) ७५(१) आणि सुधारित बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.