For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Crime | सांगली हादरली! "काय बघतोस?" या किरकोळ प्रश्नावरून ३० वर्षीय तरुणाचा निघृण खून

01:34 PM Apr 28, 2026 IST | NEETA POTDAR
sangli crime   सांगली हादरली   काय बघतोस   या किरकोळ प्रश्नावरून ३० वर्षीय तरुणाचा निघृण खून
Advertisement

                      कसबे डिग्रजमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा निर्घृण खून

Advertisement

सांगली -मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे किरकोळ कारणावरून उसळलेल्या वादाचे पर्यवसान थेट थरारक खुनात झाले.लहान मुलांच्या भांडणातून पेटलेल्या रागातून एका ३० वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून अखेर धारदार शस्त्राने बार करत निघृणपणे ठार मारण्यात आले. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मृत तरुणाचे नाव सागर संजय गायकवाड (वय ३०) असे आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान,त्याने पहाटे अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांनी माहितीनुसार, अल्पवयीन दिलेल्या एका मुलासोबत झालेल्या किरकोळ वादातून पडली. "काय बघतोस?" या साध्या प्रश्रावरून सुरू झालेल्या वादाने भीषण वळण घेतले. "थांब तुला दाखवतो" अशी धमकी देत निघून गेलेल्या मुलाने आपल्या साथीदारांसह परत येत हल्ला चढवला. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संस्कार सचिन आळतेकर (वय १९), हर्ष गिरीश चव्हाण आणि एकाअल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. सांगली ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपअधीक्षक संदीप भागवत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. जलद तपास करत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

या भीषण घटनेमुळे कसबे डिग्रज आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, "किरकोळ वादातून जीव जाणे" या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, या प्रकरणी नेमके कोणते कारण आहे, याचा शोध सांगली ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणी संदीप नारायण गायकवाड (रा. कसबे डिग्रज) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. त्यानुसार हा तपास सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून किंवा एकमेकांची ईर्ष्या यावरून हा बाद झाला आहे का इतर कोणते कारण आहे. तसेच काहींच्या म्हणण्यानुसार यामध्ये नशेचा वापरही संशयितांकडून करण्यात आला असल्याचा संशय आहे. त्यामुळे याचाही तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.