Sangli : सरसंघचालक मोहन भागवत रविवारी सांगली दौऱ्यावर
सदगुरू कोटणीस महाराज शताब्दी स्मृती चिन्हांचे करणार अनावरण तर स्वंयसेवक संघाच्या मेळाव्यास लावणार उपस्थिती
राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत रविवार 17 डिसेंबर रोजी सांगली दोर्यावर येत आहेत. सांगलीत विविध ठिकाणी भागवत यांचे कार्येक्रम होणार असून दिवसभर भागवत हे सांगलीत असणार आहेत. या पार्श्वभूमीवर सांगलीत तयारीला वेग आला आहे.
मोहन भागवत पहाटे महालक्ष्मी एक्स्प्रेसने सांगलीत येतील त्यानंतर सकाळी टिळक स्मारक मंदिर येथे लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन करतील. त्यानंतर दुपारी सकाळी 1 1 ते 1 यावेळेत डेक्कन हॉल येथे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 4 वाजता ते परम पूज्य सदगुरू कोटणीस महाराज शताब्दी पुण्यतिथी कार्यक्रमांतर्गत शताब्दी स्मृती चिन्हांचे अनावरण मोहन भागवत यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. याच ठिकाणी असणाऱ्या कोटणीस महाराजांच्या तसेच अन्य संतांनी वापरलेल्या पुरातन वस्तू साहित्याच्या प्रदर्शनाला भागवत भेट देणार आहेत. या ठिकाणी अर्धातास मोहन भागवत हे उपस्थित राहणार आसून याठिकाणी निमंत्रित धर्म बांधवांना ते संबोधित करणार आहेत. तब्बल 10 वर्षानंतर मोहन भागवत हे सांगलीत येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली जात आहे.