For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : जिह्यात सलग तिसऱ्या दिवशी वळवाची हजेरी; भाजीपाला, आंबा, केळीचे नुकसान

03:30 PM May 14, 2024 IST | Abhijeet Khandekar
sangli   जिह्यात सलग तिसऱ्या दिवशी वळवाची हजेरी  भाजीपाला  आंबा  केळीचे नुकसान
Sangli Rain
Advertisement

Advertisement

शिराळ पश्चिम, इस्लामपूर, सांगली परिसरात ढगांच्या गडगडटासह जोरदार पाऊस

सांगली प्रतिनिधी

सांगली,शिराळा पश्चिम भागा,इस्लामपूरसह अनेक भागात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी वळवाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस ऊसाच्या वाढीसाठी पोषक असून आणखी एखादा पाऊस झाल्यास अनेक भागात पेरणीपूर्व मशागतींना सुरवात होईल. परंतू तीन दिवसांच्या या वादळी पावसाने भाजीपाला, केळी आणि आंबा पिकांचे मोठ्या प्रमणावर नुकसान झाले आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर येथे वादळी वाऱ्यामुळे जि. प. शाळा नं. एकचे छत उडून गेले.

दोन दिवसा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने भाजीपाला आणि काही प्रमाणात फळबागांचे नुकसान झाले आहे. परंतू सोमवार दिवसभर कडक उन पडले होते. दुपारनंतर गार वारा आणि ढगांच्या गडगडाटासस पावसाला सुरवात झाली. सांगली शहर आणि परिसरात सुमारे तासभर पावसाने हजेरी लावली. वसगडे, नांद्रे परिसरात सायंकाळी झालेल्या पावसाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा योजनांवरील ताण कमी होईलच. पण, उसाची वाढही चांगली होईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

Advertisement

शिराळा पश्चिम भागातील गुढे ,पाचगणी, व मेणी खोऱ्यात पावसाने धुँवाधार बॅटींग केली. त्यामुळे पठारावर सध्या सुरू असलेल्या भात शेतीच्या पेरणीपूर्व मशागतींना ब्रेक लागला. परंतू या पावसाने शेतकऱ्यांमधून समाधानाचे वातावरण आहे. इस्लामपूर परिसरात वळवाच्या हजेरीने हवेत गारवा निर्माण झाला आहे. तर आष्टा परिसरात सोसाट्याचे वारे आणि ढगांच्या गडगडाटानंतर सायंकाळी हलक्या सरींनी हजेरी लावली.

तासगाव परिसरात अर्धातास हलक्या सरींनी हजेरी लावली. सोमवारी सकाळपासूनच कडक ऊन व प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारनंतर आकाशात ढग जमा होऊ लागले. सायंकाळी सहाच्या दरम्यान पावसाचे वातावरण होऊन गडगडात होऊन पावसास सुऊवात झाली. मात्र, सुमारे अर्धा तास हलकासाच पाऊस झाला आा†ण दमदार पावसाने पुन्हा हुलकावणी दिली.

दरम्यान, अवकाळी पावसाने दमदार सुरवात केली असली तरी जिह्यातील बहुतांशी भाग अद्याप कोरडाच आहे. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनांची आवर्तने सुरू आहेत. कवठेमहांकाळ ,मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा पश्चिम भागात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने बळीराज्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. परंतू खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी आणखी दमदार वळवाची प्रतीक्षा आहे.

मशागत आणि पेरणीसाठी अद्याप मोठ्या पावसाची गरज : कुंभार

पेरणीपूर्व मशगातीसाठी हा पाऊस पुरेसा नाही. मशागती आणि पेरण्यांसाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक विवेक कुंभार यांनी दिली. अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचे अद्यापतरी निदर्शनास आलेले नाही. परंतू कर्मचाऱ्यांना आपल्या भागातील माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.