Sangli Politics : सांगली पोलिसांची मोठी कारवाई; तीन जिल्ह्यांतील चोरीचे गुन्हे उघड
सांगली, कोल्हापूर, रत्नागिरीतील चोरी प्रकरणे उघडकीस
सांगली : मंदिर, तसेच घरे अशा ठिकाणी चोरी करून ऐवज लंपास करण्प्रया दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील तीन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
त्यांनी चोरलेला सुमारे १७ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अक्षय अर्जुन मोरे (रा. गोदिलवाडी, आमणापुर), संभाजी राजाराम जाधव (रा. विकास कारखाना, पलूस) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२५ डिसबर राजा सागलाताल राम मंदिरजवळ राहणाऱ्या सम्राट माने यांच्या घरी चोरी झाली होती. यातील चोरट्याना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथक तयार केले होते.
पथकातील सुशील मस्के यांना दोघेजण चोरीची भांडी, दागिने विक्री करण्यासाठी सांगलीवाडी येथील एका मंगल कार्यालयाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी शिरोळ व रत्नागिरीतील मंदिर फोडून तेथून दागिने चोरल्याचीकबुला दिला.
त्याना अटक करून त्यांच्याकडून दुचाकी, चोरीचे दागिने असे १७ लाख ६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले. दोघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर मंदिर आणि घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिंकदर वर्धन, हवालदार हणमंत लोहार, संजय पाटील, सुर्यकांत सांळुखे, अतुल माने, सुशिल मस्के, अभिजीत ठाणेकर, ऋतुराज होळकर, प्रमोद साखरपे, सोमनाथ पतंगे, सुमित सुर्यवंशी, यांच्या पथकाने ही कारवाई केली.