Sangli Job Fraud News: नोकरी लावण्याचे अमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक
12:29 PM Feb 12, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
पोस्ट खात्यात आणि पोलीस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लुटले
सांगली : शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शहरातील दोघांची एका भामट्याने तब्बल ९ लाख ८ हजार ७५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी सुनील मधुकर पाटील (वय ५३, रा. वसंतनगर, वरद इंपरीया, स्वाती गॅस एजन्सी नजीक, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी श्रीकांत कोंडिबा पवार (रा. गल्ली क्रमांक २, विद्यानगर, वारणाली, विश्रामबाग, सांगली) यांची आणि संशयित सुनील पाटील यांचा परिचय होता. फिर्यादी श्रीकांत पवार यांचा मुलगा प्रज्वल यास
पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून संशयित सुनील पाटील याने पवार यांच्याकडून ४ लाख २१ हजार ६८५ रुपये उकळले.
पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून संशयित सुनील पाटील याने पवार यांच्याकडून ४ लाख २१ हजार ६८५ रुपये उकळले.
त्याचप्रमाणे फिर्यादी पवार यांचे मित्र राजकुमार गणपती खोत (रा. मॅजेस्टिक टॉवर अपार्टमेंट, रुम क्र. २०२, हिंदु मुस्लिम चौक, पाथरवट गल्ली, खणभाग, सांगली) यांना पोलीस खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्याला बळी पडून खोत यांनी संशयित सुनील पाटील याच्याकडून ४ लाख ८६ हजार ३९० घेतले.
मात्र नोकरी न लावल्याने दोघांनीही संशयित पवार याच्याकडे वारंवार विचारणा केली. मात्र त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. हा प्रकार ८ डिसेंबर २०२२ पासून २८ मार्च २०२५ या कालावधीत घडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद नोंदविण्यात आली.
Advertisement
Advertisement